Chinchwad : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील एका सहाय्यक पोलीस निरीक्षकाला कोरोनाची लागण

Chinchwad: An Assistant Inspector of Police at Pimpri Chinchwad Police Commissionerate found coronavirus infected

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील एका सहाय्यक पोलीस निरीक्षकाला कोरोनाची लागण झाली आहे. आज, सोमवारी (दि. 18) आलेल्या अहवालात संबंधित अधिकाऱ्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. या माहितीला अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी पुष्टी दिली आहे.

संबंधित पोलीस अधिकारी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील एका विभागात कार्यरत आहेत. त्यांच्यामध्ये कोणत्याही स्वरूपाची लक्षणे नाहीत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील एका पोलीस कर्मचाऱ्याला 15 मे रोजी कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. आतापर्यंत पिंपरी चिंचवड पोलीस कोरोनापासून दूर होते. मात्र, पिंपरी चिंचवड पोलीस दलात आता कोरोनाचा शिरकाव झाला आहे.

पिंपरी चिंचवड पोलीस दलातील पोलिसांच्या कोरोनाच्या चाचण्या करण्याचे काम सुरू आहे. ज्या ज्या पोलिसांना कोरोनाची लक्षणे जाणवत आहेत. तसेच ज्यांना आपली तपासणी करून घ्यायची आहे. अशा पोलिसांच्या तपासण्या केल्या जात आहे.

कोरोनाचा पिंपरी चिंचवड शहरात शिरकाव होऊन 68 दिवस झाले आहेत. 10 मार्च रोजी शहरात पहिला रुग्ण आढळून आला. दरम्यानच्या कालावधीत सुरुवातीपासून पोलीस कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून प्रयत्न करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.