Chinchwad : कार्यालय तोडफोड प्रकरणात आरोपींकडून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न

सर्वपक्षीय पदाधिका-यांचे पोलीस आयुक्तांकडे गा-हाणे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्या कार्यालय तोडफोड प्रकरणात पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. त्यांच्याकडे पोलीस तपास करीत आहेत. मात्र, आरोपींकडून या प्रकरणाला वेगळाच रंग देण्यात येत आहे. यातून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आरोपी करीत आहेत. यामागील नेमके कारण शोधून सर्व आरोपींना अटक करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते दत्ता साने आणि सर्वपक्षीय पदाधिका-यांनी पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांच्याकडे केली.

गुरुवारी (दि. 13) सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी हे प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग करावे तसेच, साने कुटुंबियांना संरक्षण दयावे, या मागणीसाठी आयुक्त पद्मनाभन यांची भेट घेतली.

  • यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, भोसरीचे माजी आमदार विलास लांडे, विरोधी पक्षनेते दत्ता साने, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, मनसेचे गटनेते सचिन चिखली, नगरसेवक अजित गव्हाणे, नाना काटे, पंकज भालेकर, निलेश बारणे, शाम लांडे, प्रवीण भालेकर, नगरसेविका वैशाली काळभोर, सुमन पवळे, पौर्णिमा सोनवणे, संगीता ताम्हाणे, सुलक्षणा धर, भाजप नगरसेवक संजय नेवाळे, अपेक्षांचे गटनेते कैलास बारणे, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, युवकाध्यक्ष विशाल वाकडकर, सरचिटणीस फजल शेख आदी उपस्थित होते.
_MPC_DIR_MPU_II

साने यांच्या चिखली येथील कार्यालयावर शुक्रवारी (दि. 7) सात जणांच्या टोळक्याने सशस्त्र हल्ला चढवला. याप्रकरणी भोसरी पोलिसांनी देवेंद्र रामलाल बीडलानी (वय 20, रा. आंबेडकर चौक, औंध), सॅमसन सुलेमान अँमेन्ट (वय 20, रा. कमान फॅक्ट्री, खडकी) आणि गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने मुकेश प्रल्हाद कांबळे (वय 19, रा. बोपोडी) यांना अटक केली आहे.

  • आरोपींकडे केलेल्या सखोल चौकशीमध्ये साने यांच्या सोबत असणारा एक तरुण आपले ‘टार्गेट’ होते. मात्र, तो सापडला नसल्याने कार्यलयाची तोडफोड केली. अशी धक्कादायक कबुली आरोपींनी दिली. मात्र, आरोपी अशी कबुली देऊन पोलिसांची दिशाभूल करीत असल्याचा आरोप साने यांच्याकडून केला आहे.

प्रकरणाचा महिन्याच्या आत छडा लावणार; पोलीस आयुक्तांची ग्वाही
महापालिकेचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्या कार्यालय तोडफोड प्रकरणाचा सर्व शक्यता लक्षात घेऊन तपास सुरु आहे. मी स्वतः या प्रकरणामध्ये लक्ष देत असून एक महिन्याच्या आत या प्रकरणाचा छडा लावला जाईल, अशी ग्वाही पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.