Chinchwad: वाहनाच्या धडकेत भिक्षेकरी वृद्धा ठार

एमपीसी न्यूज – भिक्षा मागण्यासाठी गेलेल्या वृध्द महिलेच्या वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. ही घटना 20 एप्रिल रोजी चिंचवड येथील मोरया गोसावी मंदिरासमोर घडली.

शांताबाई मसा खंडागळे (वय 75, रा. चापेकर चौक, चिंचवड) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचा मुलगा शिवाजी मसा खंडागळे (वय 50) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

शांताबाई या मोरया गोसावी मंदिरासमोरील रस्त्यावरून भिक्षा मागण्यासाठी अन्य एका महिलेसोबत जात होत्या. त्यावेळी त्यांना भरधाव वेगाने आलेल्या एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. वाहन चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. चिंचवड पोलीस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.