Chinchwad : मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या वृद्धाला फसवले

एमपीसी न्यूज – मॉर्निंग वॉक करत असलेल्या वृद्धाला (Chinchwad) एका व्यक्तीने फसवले. वृद्ध व्यक्तीला अनोळखी व्यक्तीने तो पोलीस असल्याचे भासवून वृद्धाकडील पैसे आणि दागिने घेऊन तो पळून गेला. ही घटना सोमवारी (दि. 27) सकाळी नऊ वाजता चिंचवडगाव येथे घडली.

ताराचंद मांगीलाल शर्मा (वय 71, रा. पिंपरी) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दुचाकीवरून आलेल्या अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शर्मा हे सोमवारी सकाळी चालत जात होते. ते चिंचवड गाव येथील राजपार्क सोसायटी समोर आले असता त्यांच्या जवळ दुचाकीवरून एकजण आला. त्या व्यक्तीने तो पोलीस असल्याचे शर्मा यांना सांगितले.

Hingoli : अरुण बोऱ्हाडे यांच्या ‘राष्ट्रभक्तांची स्मरणगाथा’ पुस्तकाला संत नामदेव राष्ट्रीय वैचारिक साहित्य पुरस्कार

‘काळ येथे अनोळखी व्यक्तीने सकाळी फिरणाऱ्या लोकांना मारहाण करून त्यांचे पैसे व सोन्याचे दागिने चोरून नेले आहेत’ (Chinchwad) अशी बतावणी त्या आरोपीने केली. शर्मा यांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडील 33 हजार 900 रुपये रोख रक्कम आणि 55 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने असा एकूण 88 हजार 900 रुपयांचा ऐवज घेऊन आरोपी पळून गेला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.