Chinchwad: पतीने खून केलेल्या महिलेच्या संतप्त नातेवाईकांचा पोलीस ठाण्यावर मोर्चा

एमपीसी न्यूज – पत्नीचा खून करणाऱ्या आरोपीवर कडक कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी खून झालेल्या महिलेच्या संतप्त नातेवाईकांनी काल रात्री चिंचवड पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. सखोल तपास करून लवकरात लवकर आरोपीवर कारवाई करण्याचे आश्वासन पोलीस अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.

चिंचवडमध्ये पतीने पत्नीचा खून केल्याची घटना काल, शुक्रवारी (दि. 6) सकाळी चिंचवड येथील दगडोबा चौकात उघडकीस आली होती. हसनसाहब दस्तगिरसाहब नदाफ (वय 41, रा. दगडोबा चौक, चिंचवड. मूळ रा. अजनानपूर, जि. गुलबर्गा, कर्नाटक) असे आरोपी पतीचे नाव आहे. बानू हसनसाहब नदाफ (वय 35) असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे.

यातील मृत महिलेच्या नातेवाईकांनी काल रात्री चिंचवड पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून संताप व्यक्त केला. त्यावेळी विमेन हेल्पलाईनच्या संस्थापक अध्यक्ष नीता परदेशी यांनी संतप्त नातेवाईकांना शांत राहण्याचे आवाहन केले. खूनप्रकरणी आरोपी पतीला अटक करण्यात आली असून याप्रकरणी सखोल तपास करून सबळ पुराव्यांसह लवकरात लवकर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात येईल, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. त्यानंतर जमाव शांत झाला व आंदोलन स्थगित करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.