Chinchwad : माथाडी कामगारांसाठी अण्णासाहेब पाटील यांनी केलेले कार्य दीपस्तंभासारखे – इरफान सय्यद
महाराष्ट्र मजदुर संघटनेच्या वतीने स्व.अण्णासाहेब पाटील यांना अभिवादन

एमपीसी न्यूज – अण्णासाहेब पाटील (Chinchwad) यांनी गोरगरीब कष्टकरी माथाडी कामगारांच्या करिता केलेलं कार्य हे एका दीपस्तंभ सारखे आहे. माथाडी कामगारांच्या कुटुंबिय, आर्थिक सामाजिक जीवनात आमूलाग्र बदल होण्यासाठी दिवंगत अण्णासाहेब पाटील यांचे योगदान खूप मोठे आहे.
त्याचे कार्य नेहमीच आमच्यासाठी प्रेरणादायी राहील. अण्णासाहेब पाटील यांनी माथाडी कामगारांच्या आणलेला माथाडी कायदा प्रत्येक कामगार यांनी अभ्यासाला पाहिजे तेच खरे त्यांच्या स्मृतीला व विचारांना अभिवादन असेल असे मत महाराष्ट्र मजदूर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा शिवसेना उपनेते, कामगार नेते इरफान सय्यद यांनी व्यक्त केले.
अण्णासाहेब पाटील यांच्या जयंती निमित्त चिंचवड येथील (Chinchwad) त्यांच्या पुतळ्याला महाराष्ट्र मजदूर संघटनेच्या वतीने पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी कामगार नेते इरफान सय्यद, परेश मोरे, प्रवीण जाधव, भिवाजी वाटेकर, पांडुरंग काळोखे, सर्जेराव कचरे, पांडुरंग कदम, सतीश कंठाळे,नागेश व्हणवटे, दादा कदम, समर्थ नाईकवाडे, अमित पासलकर, गोरक्षनाथ दुबाले, बबन काळे, संपत मांढरे, अशोक साळुंखे, ज्ञानेश्वर घनवट, गिरीश देशमुख,चंद्रकांत पिंगट, सोमनाथ फुगे, संदीप जांभळे,रोहित नवले, बालाजी खैरे,विकास साळुंखे,सुनील खोपडे ,राहुल मांडवे, विनोद जाधव,सोमनाथ देशमुख, निलेश चतुर, सचिन प्रचंड, संतोष पवार, नवनाथ नरळे, अमर सय्यद, अक्षय कदम, गणेश देवडकर, अतुल फरतडे, युवराज पोतेकर, सूरज भोसले, चंदन वाघमारे, रत्नाकर भोजने व असंख्य कामगार मोठ्या संख्यने उपस्थित होते.
कामगार नेते इरफान सय्यद म्हणाले, माथाडी कामगारांचे दैवत स्व.अण्णासाहेब पाटील यांची जयंती निमित्त त्यांच्या स्मृतीला अभिवादन. आज खऱ्या अर्थाने साहेबाच्या विचाराना प्रमाण मानून कष्टकरी माथाडी हमाल मापडी कामगाराच्या करिता कार्य करणारे सरकार राज्यात प्रस्थापित झाले असे वाटते.
कारण पावसाळी अधिवेशनात राज्य सरकारने महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार अधिनियम 1969 यात बदल करण्यासाठी काही सुधारणा करण्यासाठी विधिमंडळ मध्ये विधेयक ठेवण्यात आले आहे.
त्या विधेयकामध्ये सुधारणा करण्यासाठी काही सूचना माथाडी कामगार, संघटना यांना 6 ऑक्टोबर पर्यंत मागविण्यात आल्या तरी जास्तीत जास्त संख्येने आपल्याला भेडसावत असलेल्या अडचणी सोडवण्यासाठी त्यावरील योग्य सूचनेसह राज्य सरकार यांना पाठवाव्यात हीच आजच्या दिवशी सर्व माथाडी बांधव यांना विनंती करीत आहे.
स्व.अण्णासाहेब पाटील यांनी लाखो कष्टकरी माथाडी , मापाडी कामगार यांना सन्मानाने जगता यावे यासाठी आपले पूर्ण आयुष्य वेचले . पाटण तालुक्यातील मुंदुळ कोळे यागावी जन्मलेल्या अण्णासाहेब यांनी कुटुंबाचा उदरनिर्वाहासाठी मुबई गाठली. मुंबईत आल्यावर तेथे उसाच्या चारकावर आपल्या कष्टकरी जीवनाला प्रारंभ केला.
Pune : प्रक्षोभक भाषण दिल्याप्रकरणी मिलिंद एकबोटे यांच्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हा
नंतर दारुखाणा येथे ओझे उचलण्याची कामे केली.ही कामे करत असताना कामगारांना मिळणारा मोबदला , मालकाकडून होणारी पिळवणूक पाहून त्यांचे मन तळमळत असे त्या तळमळीतून माथाडी कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढा त्यांनी चालू केला. व पुढे अनेक राजकीय नेत्यांकडे सरकार दरबारी पत्रव्यवहार पाठपुरावा करून माथाडी कायदा अमलात आणला .
त्यामुळे माथाडी कामगारांना न्याय मिळून आज माथाडी संघटन हे एक बलाढ्य संगटन म्हणून नावारूपाला आले अण्णासाहेब पाटील यांनी गोरगरीब कष्टकरी माथाडी कामगारांच्या करिता केलेलं कार्य हे एका दीपस्तंभ सारखे आहे. माथाडी कामगारांच्या कुटुंबीक , आर्थिक सामाजिक जीवनात आमूलाग्र बदल होण्यासाठी स्व अण्णासाहेब पाटील यांचे योगदान खूप मोठे आहे.त्याचे कार्य नेहमीच आमच्यासाठी प्रेरणादायी राहील.
गुंड प्रवृत्तीच्या लोकांच्या मुळे माथाडी कामगार व कायदा बदनाम
सध्या माथाडी मध्ये काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांच्या मुळे माथाडी कामगार व कायदा बदनाम झाला आहे. गाव खेड्यातून आलेला आमचा माथाडी कामगार कधीही दादागिरी करीत नाही.
प्रामाणिकपणे काम तो करुन श्रमाचा मोबदला मागतो. चुकीचे लोक माथाडीच्या नावाखाली कंपनी व्यवस्थापनाला व माथाडी कामगारांना वेठीस धरतात. पिंपरी- चिंचवड ही कामगारनगरी आहे. काही संघटनांच्या त्रासाला कंटाळून कंपन्या स्थलांतरित होत आहेत, हे थांबले पाहिजे. उद्योग टिकले तरच कामगार टिकेल, असेही ते म्हणाले.