Chinchwad : ताराबाई शंकरलाल मुथा कन्या प्रशालेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

एमपीसी न्यूज- चिंचवड येथील सौ. ताराबाई शंकरलाल मुथा कन्या प्रशालेमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात पार पडला.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जैवविवधता व आघारकर संशोधन संस्थेचे शास्त्रज्ञ डॉ. पी. एन. सिंह उपस्थित होते. अध्यक्षस्थानी डॉ. रसिकलाल माणिकचंद नहार होते. इयत्ता आठवी ते दहावी विभागाच्या स्नेहसंमेलनाची सुरूवात ईशस्तवन, नवकार महामंत्र व दीपप्रज्वलनाने झाली. प्रशालेच्या प्राचार्या चंद्रकला बोरा यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी वार्षिक गुणवत्ता वाढ व विद्यार्थिनींच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेतला. मनीषा कलशेट्टी यांनी प्रशालेतील विविध उपक्रमांचे सादरीकरण पीपीटीच्या माध्यमातून केले. पाहुण्यांचा परिचय पर्यवेक्षिका सारंगा भारती यांनी करून दिला.

डॉ. पी. एन. सिंह म्हणाले की, विज्ञानातील आविष्कारांची किमया व शिक्षणाचे महत्त्व सांगितले. आपला सर्वांगीण विकास घडविण्याचे शाळा हे माध्यम आहे, असे ते म्हणाले. डॉ. रसिकलाल माणिकचंद नहार यांनी अभ्यासाबरोबरच आरोग्याकडे देखील लक्ष द्यावे अशी सूचना केली. संस्थेचे मानद महासचिव अॅड. राजेंद्र शंकरलाल मुथा व सहायक सचिव प्रा. अनिलकुमार मोतीलाल कांकरिया यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. प्रमुख पाहुणे व सर्व मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले.

विविध गुणदर्शनातील आसामी, राजस्थानी, कोळी, मल्हार, देशभक्तीपर नृत्यांनी कार्यक्रम रंगतदार झाला. कार्यक्रमास विविध शाखांचे प्रमुख, उपप्रमुख, अध्यापिका, उपमुख्याधिका मनीषा जैन, ताराबाई शंकरलाल मुथा कनिष्ठ महाविद्यालयाचे विभागप्रमुख विनायक थोरात, बीएड कॉलेजच्या प्राचार्या राजश्री सुपेकर, संस्थेचे सतीश भारती, विभागप्रमुख सविता होनराव तसेच सर्व शिक्षक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

मनीषा कलशेट्टी यांनी सूत्रसंचालन केले. सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पल्लवी दुसाने यांनी यांनी केले. पर्यवेक्षिका सांरगा भारती यांनी आभारप्रदर्शन केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.