-MPC-TOP-MOST-BANNER-I

Chinchwad: सेंट पॉल स्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – मोहननगर येथील आशीर्वाद संस्थेच्या सेंट पॉल स्कूलचे वार्षिक स्नेसंमेलन रामकृष्ण मोरे सभागृहात नुकतेच उत्साहात पार पडले.

 

या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर ,नगरसेविका मीनल यादव, माजी नगरसेवक मधुकर बाबर , अनंत कोऱ्हाळे, पत्रकार आशा साळवी, संस्थेच्या संस्थापिका स्मिथ मॅडम, पिटर सर उपस्थित होते.

 

शाळेतील विद्यार्थी- विद्यार्थिनींनी या प्रसंगी नृत्य, नाटक, कराटे प्रात्यक्षिक सादर केली. ईश्वरी मोहिते हिच्या नृत्याचे सर्वांनी विशेष कौतुक केले. सादर केलेल्या सर्व कार्यक्रमाच्या वेशभूषा अतिशय उत्तम होत्या.

 

आपले ध्येय हे एव्हरेस्ट शिखराप्रमाणे असावे, असे प्रमुख पाहुणे डॉ विवेक मुगळीकर यांनी सांगितले. मीनल यादव, मधुकर बाबर, अनंत कोऱ्हाळे, पत्रकार आशा साळवी यांनीही मनोगत व्यक्त केले.

स्नेहसंमेलन यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षकांनी विशेष प्रयत्न केले. सूत्र संचलन प्रियांका बिऱ्हाडे व क्रांती माने यांनी केले. कार्यक्रमाची संपूर्ण संकल्पना आम्रपाली सावंत यांची होती. स्नेहसंमेलनासाठी पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.