BNR-HDR-TOP-Mobile

Chinchwad : ‘अँटी गुंडा स्क्वॉड’चा कारवाईचा बडगा; तीन महिन्यात केली 73 हजार जणांवर कारवाई

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या ‘अँटी गुंडा स्क्वॉड’ने मागील तीन महिन्यात टवाळखोर, हुल्लडबाज प्रवृत्तीच्या तसेच बेशिस्त वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारला. पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी दिलेल्या आदेशानुसार 9 मे ते 12 ऑगस्ट 2019 या कालावधीत सर्व पोलीस ठाण्यांचे तपास पथक, गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दररोज रात्री सात ते बारा या कालावधीत गस्त घालून कारवाई केली. तीन महिन्यात पोलिसांनी एकूण 83 हजार 948 वाहने चेक केली. त्यातील 73 हजार 119 वाहनचालकांवर कारवाई केली.

हुल्लडबाज वाहनचालकांकडून रस्त्याने जाणा-या नागरिकांना त्रास देण्याचे प्रकार समोर आले. तसेच विरुद्ध दिशेने वाहन चालविल्यामुळे अपघात होण्याची भीती असल्याने ही कारवाई करण्यात आली.

अँटी गुंडा स्क्वॉडने केलेल्या कारवाईची आकडेवारी खालीलप्रमाणे : –

# एकूण चेक केलेली वाहने – 83 हजार 948
# भारतीय दंड विधान 279 प्रमाणे गुन्हे दाखल – 169
# मुंबई पोलीस कायद्यान्वये (कलम 110, 112, 117 अन्वये) – 3 हजार 245
# पोलीस स्टेशनकडे कारवाईसाठी दिलेली प्रकरणे – 57
# मुंबई पोलीस कायद्यान्वये (कलम 102 प्रमाणे) – 261
# ट्रिपल सीट – 10 हजार 467
# विना हेल्मेट वाहन चालवणे – 3 हजार 143
# विनापरवाना / कागदपत्रे सोबत न बाळगणे – 38 हजार 465
# वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे – 4 हजार 613
# मुंबई पोलीस कायद्यान्वये (कलम 68, 69 प्रमाणे) – 1 हजार 942
# हॉटेलांवर केलेली कारवाई – 649
# फॅन्सी नंबर प्लेट – 2 हजार 508
# नंबर प्लेट नसणे – 2 हजार 508
# मुंबई पोलीस कायद्यान्वये (कलम 142 प्रमाणे) – 26
# रॅश ड्रायव्हींग – 491
# सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी – 4
# मुंबई पोलीस कायद्यान्वये (कलम 207 प्रमाणे) – 34
# अन्य वाहतूक बाबतीत – 4 हजार 706

HB_POST_END_FTR-A2

.