Chinchwad : दरोडा विरोधी पथकाची मोठी कारवाई; आयुक्तालयाच्या हद्दीतून गहाळ झालेले 70 मोबाईल शोधले

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून गहाळ ( Chinchwad) झालेल्या मोबाईलचा शोध घेण्यात दरोडा विरोधी पथकाला मोठे यश आले आहे. पथकाने तब्बल 70 मोबाईल फोन राज्याच्या विविध भागातून हस्तगत केले आहेत. हस्तगत केलेले मोबाईल फोन त्यांच्या मूळ मालकांना लवकरच परत मिळणार आहेत.
गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सन 2023 आणि 2024 मध्ये मोबाईल फोन गहाळ झाल्याच्या अनेक तक्रारी ऑनलाइन माध्यमातून आल्या होत्या. त्याबाबत कार्यवाही करण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सूचना दिल्या होत्या. त्यानंतर दरोडा विरोधी पथकातील पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांनी गहाळ झालेले मोबाईल शोधण्यासाठी एक पथक तयार केले. पिंपरी चिंचवड पोलिसांकडे ऑनलाइन माध्यमातून मोबाईल गहाळ झाल्याबाबत आलेल्या तक्रारी या पथकाने एकत्रित केल्या. त्यानंतर तांत्रिक विश्लेषण विभागाचे नागेश माळी आणि पोपट हुलगे यांच्याकडून गहाळ झालेल्या मोबाईलबाबत तांत्रिक तपास करण्यात आला.
गहाळ झालेले मोबाईल फोन काही दिवसानंतर ऍक्टिव्ह झाले होते. त्याबाबत तांत्रिक विश्लेषण विभागाने माहिती संकलित केली. ही माहिती दरोडा विरोधी पथकाला देण्यात आली. त्यानुसार या पथकाने अमरावती, कोल्हापूर, अहमदनगर, नाशिक, बीड, जालना, औरंगाबाद, धाराशिव, सोलापूर या जिल्ह्यांमधून 10 लाख 14 हजार 700 रुपये किमतीचे 70 मोबाईल फोन ( Chinchwad) हस्तगत केले. हे मोबाईल फोन मूळ मालकांना परत केले जाणार आहेत.

ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त (गुन्हे) संदीप डोईफोडे, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे 1) बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शनाखाली दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, सायबर सेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पानमंद, पोलीस उपनिरीक्षक भरत गोसावी, पोलीस अंमलदार प्रवीण कांबळे, महेश खांडे, औदुंबर रोंगे, उमेश पुलगम, विक्रांत गायकवाड, गणेश हिंगे, आशिष बनकर, राहुल खारगे, नितीन लोखंडे, प्रवीण माने, सागर शेडगे, गणेश कोकणे, गणेश सावंत, सुमित देवकर, विनोद वीर, अमर कदम, समीर रासकर, चिंतामण सुपे, तांत्रिक विश्लेषण विभागाचे नागेश माळी, पोपट हुलगे यांनी केली.
गहाळ झालेल्या मोबाईलबाबत अशी करा तक्रार
मोबाईल फोन गहाळ झाल्यास pcpc.gov.in या संकेतस्थळावर भेट द्या. संकेतस्थळावर स्क्रोल डाऊन केल्यावर ‘मोबाईल गहाळ फॉर्म’ असा पर्याय दिसेल. त्यानुसार क्लिक केल्यास सीसीटीएनएस (क्राइम अँड क्रिमिनल ट्रेकिंग नेटवर्क सिस्टीम) या पेजवर रिडायरेक्ट होईल. तिथे तक्रारदाराचे नाव, मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी, पत्ता, मोबाईल गहाळ झालेले ठिकाण आणि विस्तृत माहिती द्यावी. त्यानंतर सेल्फ डिक्लेरेशनच्या चौकोनावर क्लिक करून सबमिट ( Chinchwad)  करावे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.