Chinchwad : मावळ आणि शिरूर मतदारसंघांत मतदान शंभर टक्के व्हावे – विजय गुप्ता

एमपीसी न्यूज – मावळ आणि शिरूर मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढावा, याकरिता चिंचवडच्या काळभोरनगर येथील हायवे टॉवर्समधील मिटिंग हॉलमध्ये फेडरेशन ऑफ असोसिएशनच्या वतीने मतदार जागृती अभियान राबविण्यात आले.

यावेळी गजानन बाबर, गोविंद पानसरे, विजय गुप्ता, के. एल. बन्सल, गंगाराम पटेल, अमोलिक दुगड, चरणसिंग जमतानी, अनिल रणवरे, नामदेव शं बच्चे, बाबूराव गर्ग, आदी विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

ऑल महाराष्ट्र फेअर प्राईस असोसिएशनचे सचिव विजय गुप्ता म्हणाले की, ”पुणे लोकसभा मतदारसंघात मतदानाचा टक्का कमी झाला आहे. मावळ आणि शिरूर मतदारसंघांत मतदान शंभर टक्के व्हावे, यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला आहे” मतदान मार्गदर्शक पुस्तिकांचे वाटप करून, मतदानाबाबत जागृती करावी, असे आवाहन गुप्ता यांनी सभासदांना यावेळी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.