Pune : चिंचवड परिसरात 24 तासात 52 मिमी पावसाची नोंद, पुणे जिल्ह्याला यलो अलर्ट

एमपीसी न्यूज – पुण्यासह (Pune) मध्य महाराष्ट्रात दोन दिवस जोरदार पावसाची हजेरी सांगितली आहे. त्यामुळे नागरिकांना विसर्जनावेळी ही योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन हवामान खात्याने केले आहे. हवामान खात्याच्या नोंदीनुसार चिंचवडमध्ये मागील 24 तासाच 52 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर पुणे जिल्ह्यात सर्वात जास्त पाऊस हा नारायणगाव येथे झाला असून 74 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.

Pune : पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील म्हाडा घरांच्या अर्जासाठी 20 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

मागील चोवीस तासाच्या नोंदीनुसार नारायणगाव, चिंचवड खालोखाल डुडुळगाव येथे 28 मिमी, खेड 26.5 मिमी,हडपसर 17 मिमी, निमगिरी 13.5 मिमी, बल्लाळवाडी 12.5 मिमी,आबेंगाव 12 मिमी, लवळे 11.5 मिमी अशी पावसाची नोंद करण्यात आली आहे.

छत्तीसगडपासून दक्षिण कर्नाटकपर्यंत हवेच्या कमी दाबाची रेषा तयार झाली आहे. या पोषक स्थितीचा परिणाम म्हणून राज्यात पुढील दोन-तीन दिवस पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे. मुंबई, पुण्यात गुरुवारी निघणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. त्यासह मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह एक-दोन जोरदार सरी कोसळण्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला आहे.

दक्षिण कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. तर कोकणातील ठाणे, रायगड, मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांत जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) आहे. विदर्भासह, उर्वरित कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.