Chinchwad : सिगारेटचे पैसे मागितल्यावरून तरुणावर वार

एमपीसी न्यूज – सिगारेट पैसे मागितले या रागातून तीन जणांनी मिळून तरुणाला बेदम मारहाण करून त्याच्यावर लोखंडी कोयत्याने वार केले. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना चिंचवड येथील हॉटेल समोर रविवारी (दि. 2) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली.

साबीर अब्बास सय्यद (वय 20, रा. लालटोपीनगर, पिंपरी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्याने या प्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार करण पवार आणि त्याचे दोन साथीदार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साबीर आणि करण हे दोघे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. साबीर याची ईगल हॉटेलसमोर पान टपरी आहे. टपरीवर रविवारी सायंकाळी करण आणि त्याच्या दोन साथीदारांनी सिगारेट घेतली. आरोपींनी सिगरेटचे पैसे दिले नाही. साबीर याने सिगरेटचे पैसे मागितले. या रागातून आरोपींनी साबीरला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ केली. तसेच करण याने त्याच्या जवळ असलेल्या लोखंडी कोयत्याने साबिरच्या हातावर वार केले. यामध्ये साबीर गंभीर जखमी झाला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.