Chinchwad : माजी नगरसेवक गणेश लोंढे यांच्यावर प्राणघातक हल्ला

एमपीसी न्यूज- दुचाकीवरून आलेल्या तीन जणांनी काँग्रेसचे माजी नगरसेवक गणेश लोंढे यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. गुरुवारी (दि.४) रात्री साडे नऊच्या सुमारास चिंचवड तानाजीनगर येथे ही घटना घडली. योगायोगाची गोष्ट म्हणजे आज लोंढे यांचा वाढदिवस आहे. 

या प्रकरणी गणेश लोंढे यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून गणेश घोलप, आकाश घोलप, सुमित लवे या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री लोंढे हे कामानिमित्त त्यांच्या मोटारीतून चिंचवड येथे गेले होते. तानाजीनगर येथील शिवाजी उदय मंडळ जवळ आले असता दुचाकीवरून आलेल्या आरोपींनी त्यांना अडवले. त्यांना मोटारीबाहेर खेचून शस्त्राने वार केले. यामध्ये लोंढे जखमी झाले असून त्यांच्यावर थेरगाव येथील खासगी रुग्णलयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर आरोपी पसार झाले असून चिंचवड पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.