Chinchwad : सुरक्षा रक्षकाला मारहाण करत जागेवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न

एमपीसी न्यूज – गेटचे कुलुप तोडून सुरक्षा रक्षकाला मारहाण (Chinchwad) करत जागेवर ताबा मिळवण्याचा दोघांनी प्रयत्न केला आहे. हा प्रकार चिंचवड येथे मंगळवारी (दि.30) सकाळी घडली.

या प्रकरणी माऊली उर्फ किसन रामा भोसले (वय 30 रा.चिंचवड) यांनी फिर्याद दिली असून सुशील अगरवाल आणि त्याचा मुलगा व एक इसम यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Pune : पुणे पोलिसांनी जप्त केले 5 कोटी रुपयांचे ड्रग्ज

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे रहात असलेल्या परिसरात आरोपी आले व त्यांनी फिर्यादीला गेट उघड ही आमची जागा असून आम्हाला काम करायचे आहे म्हणत धमकी दिली. तसेच गेटचे कुलुप तोडून आत प्रवेश करत फिर्यादीच्या कानाखाली देत फिर्यादीला शिवीगाळ केली.

तसेच घरातील सामानाची  नासधूस करत अडगळीच्या खोलीतले सामान बाहेर फेकून दिले. यावरून चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस पुढील तपास करत (Chinchwad) आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.