BNR-HDR-TOP-Mobile

Chinchwad : अहमदाबाद मधील उच्च शिक्षित तरुणाची बॅग चिंचवडमध्ये लांबवली

एमपीसी न्यूज – अहमदाबाद मधील उच्च शिक्षित तरुणाची बॅग त्याच्या तोंड ओळखीच्या इसमाने चिंचवड येथील एका हॉटेलमधून लांबवली. ही घटना शनिवारी (दि. 24) दुपारी साडेपाचच्या सुमारास चिंचवड मधील अहिंसा चौकातील कामिनी हॉटेलमध्ये घडली.

धीरज रामकिशन अजमीर (वय 19, सध्या रा. सीओरा विस्टा, वीरभद्रा नगर, बाणेर) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार श्रीकांत चौधरी (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी धीरज मूळचे अहमदाबाद येथील आहेत. त्यांचे एमबीबीएसचे शिक्षण सुरु आहे. मागील सहा महिन्यांपूर्वी त्यांची ओळख आरोपी श्रीकांत याच्याशी झाली. शनिवारी दुपारी धीरज अहमदाबाद वरून पुण्याला आले. त्यावेळी त्यांना घेण्यासाठी श्रीकांत पुणे विमानतळावर गेला. त्यांना घेऊन तो चिंचवड मधील कामिनी हॉटेल येथे आला. हॉटेलमधील रूममध्ये पोहोचल्यानंतर श्रीकांत याने त्याला इमेल करण्यासाठी धीरज यांचा लॅपटॉप हवा असल्याचे सांगितले. धीरज यांनी लॅपटॉप बॅग श्रीकांत याच्याकडे दिली आणि ते फ्रेश होण्यासाठी गेले. या संधीचा फायदा घेत श्रीकांत याने लॅपटॉप, मोबाईल फोन आणि घड्याळ असा एकूण 85 हजार रुपयांचा ऐवज घेऊन पोबारा केला. धीरज फ्रेश होऊन आल्यानंतर रूममध्ये बघितले असता श्रीकांत आणि त्यांचे सामान दोन्ही गायब होते. त्यावरून चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. चिंचवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3