Chinchwad : बजाज फायनान्स कंपनीत पावणे तीन लाखांची चोरी!

एमपीसी न्यूज – बजाज फायनान्स कंपनीच्या कार्यालयाच्या खिडकीचे कुलूप तोडून चोरट्यांनी आतील पावणे तीन लाखांचा ऐवज चोरून नेला. ही घटना रविवारी (दि. 8) पहाटे चिंचवड येथे घडली.

नारायणराव जेधे (वय 40, रा. मयुरी रेसिडेन्सी, कात्रज बायपास, उंड्री, पुणे) यांनी सोमवारी (दि. 9) चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचवडगाव येथील अहिंसा चौकात बजाज फायनान्स कपंनीचे कार्यालय आहे. रविवारी पहाटे तीन ते सहा वाजताच्या दरम्यान चोरट्यांनी फायनान्स कंपनीच्या कार्यालयात प्रवेश केला. चोरट्यांनी खिडकीचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.

आतील कॅशिअरची केबिन व काऊंटरचे ड्रावर उचकटून आतील दोन लाख 74 हजारांचा ऐवज चोरून नेला. तसेच आतील सीसीटिव्हीची तोडफोड करून नुकसान केले. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.