BNR-HDR-TOP-Mobile

Chinchwad : दफन क्रियेसाठी गेलेल्या तरुणाला मारहाण; चौघांविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – दफन क्रियेसाठी गेलेल्या तरुणाला चौघांनी मिळून मारहाण केली. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना बुधवारी (दि. 11) दुपारी साडेबाराच्या सुमारास चाफेकर चौकातील कबरस्थान येथे घडली.

सागर गणेश भिसे (रा. मोहननगर, पिंपरी) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार वैभव श्याम माने, अजय कांबळे, संतोष माने, ओमकार शिंदे (सर्व रा. मोहननगर, पिंपरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सागर हे रमजान शेख यांच्या दफन क्रियेसाठी बुधवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास चाफेकर चौक चिंचवड येथील कब्रस्थान मध्ये गेले. दफनक्रिया सुरू असताना आरोपींनी सागर यांना बाजूला घेतले.

‘रमजान यास काय केले’ असे म्हणत आरोपींनी सागर यांना हाताने वर लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच दगडाने डोक्यात व पाठीवर मारून जखमी केले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

.