BNR-HDR-TOP-Mobile

Chinchwad : मागील भांडणाच्या कारणावरून एकाला मारहाण: दोघांना अटक

एमपीसी न्यूज – एक दिवसापूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून दोघांनी मिळून एकाला बेदम मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि. 12) रात्री पावणेआठच्या सुमारास जगदंब चायनीज रेस्टॉरंट समोर दत्तनगर चिंचवड येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

लड्या उर्फ श्रीकांत शाम पिल्ले (वय 28), संदीप राधेश्याम गुप्ता (वय 22, दोघे रा. रामनगर, चिंचवड) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी दीपक ऊर्फ राजदीप राजकुमार शर्मा (वय 37, रा. मोहननगर, चिंचवड) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि दीपक हे एकमेकांचे चांगले मित्र आहेत. यांच्यामध्ये सोमवारी किरकोळ कारणावरून भांडण झाले. या भांडणाच्या कारणावरून मंगळवारी रात्री पावणेआठच्या सुमारास आरोपींनी दीपक यांना अडवले. त्यांना कारमधून खाली उतरून बेसबाॅलच्या लाकडी दांडक्याने व चायनीज बनविण्याच्या पळीने मारहाण केली. यामध्ये दीपक यांच्या तोंडावर आणि अंगावर गंभीर इजा झाली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3