Chinchwad : भाई वैद्य स्मृती श्रमसारथी पुरस्कार काशीनाथ नखाते यांना जाहीर

रविवारी श्रमउद्योग परिषद

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास परिषद महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेच्या वतीने रविवार (दि. 28) श्रमउद्योग परिषद आयोजित करण्यात आली. चिंचवड येथील ऑटोक्लस्टर सभागृहात सायंकाळी चार वाजता होणाऱ्या कार्यक्रमात कष्टकरी संघर्ष महासंघाचे अध्यक्ष काशीनाथ नखाते यांना भाई वैद्य स्मृती श्रमसारथी पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. अशी माहिती महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले यांनी दिली आहे.

या श्रम उद्योग परिषदेचे उदघाटन भोसरी येथील डायनोमर्क कंट्रोलचे उपाध्यक्ष सूर्यकांत मुळे व ज्येष्ठ समाज सुधारक गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी अध्यक्षस्थानी नगरचे सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी शरद जाधव असणार आहेत. यावेळी कामगार उपायुक्त एस. बी. बागल, टाटा मोटर्सचे मनोहर पारळकर, स्वागताध्यक्ष सुदाम भोरे आदी उपस्थित राहणार आहेत.

यावेळी भाई वैद्य स्मृती श्रमसारथी पुरस्कार कष्टकरी संघर्ष महासंघाचे अध्यक्ष काशीनाथ नखाते यांना, उत्कृष्ठ औद्योगिक संबंध पुरस्कार चाकण येथील प्रदीप लॅमिनेटर प्रा. लि. चे कार्यकारी संचालक राजकुमार आगरवाल, महाराष्ट्र उद्योग भूषण पुरस्कार चिंचवडचे वसंत ग्रुपचे कार्यकारी संचालक अरुण मित्तल, महाराष्ट्र उद्योग मित्र पुरस्कार देहुगावचे प्रमोद कुलकर्णी यांना प्रदान करण्यात येणार आहे.

कष्टक-यांच्या जीवनांत नवी पहाट केव्हा उगवेल या विषयावर श्रमश्री बाजीराव सातपुते यांचा परिसंवाद होणार आहे. श्रमप्रतिष्ठेसाठी उपेक्षित कष्टक-यांचा सत्कारांमध्ये स्मशानभूमी सेवक – विठ्ठल भाऊसाहेब देवकर, गटई कामगार – भैरवनाथ दगडू घोडके, शवविचे्छदन मजूर – विकी राम रेड्डी, मोलकरीण – निशा बनसोडे, बांधकाम मजूर – बालाजी दादाराव शिंदे, सफाई मजूर- रत्नाबाई गोतीष, गृहसुरक्षा रक्षक – अशोक संतोष गोतीष, गटार कुली – बाबू शंकर यमगर, हॉटेल कामगार – तानाजी गावडे, हातगाडी फळ विक्रेता – आप्पा मारकड यांना पुरस्कार देण्यात येणार आहे. यावेळी शवविच्छेदन मजूर विकी रेड्डी, मोलकरीण निशा बनसोडे , गटार कुली बाबू रामगर यांची प्रकट मुलाखत होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.