Chinchwad : महाराष्ट्राच्या विकासात तेलगू मन्नेरवारलू समाजाचे मोठे योगदान – शिरीष पोरेड्डी 

एमपीसी न्यूज – तेलगू मन्नेरवारलू समाजाचे महाराष्ट्राच्या विकासात (Chinchwad)मोठे योगदान आहे असे मत शिरीष पोरेड्डी यांनी व्यक्त केले. तेलगू मन्नेरवारलू ज्ञातगंगा समाजाच्या वतीने आयोजित समाज बांधवांच्या मेळाव्यात पोरेड्डी बोलत होते.रविवारी (दि. 11) रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे हा मेळावा पार पडला.

स्नेहसंमेलनासाठी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून समाज बांधव स्नेहसंमेलनासाठी सह-कुंटुब सह – परिवार उपस्थित  होते. या कार्यक्रमासाठी महापारेषणच्या सेवानिवृत्त अधीक्षक अभियंता विजया मुखेडकर या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.

Pune : युवा मोर्चाने संघटनेत खारीचा वाटा न ठेवता सिंहाचा वाटा ठेवावा – नितेश राणे

दोन सत्रा मध्ये हा कार्यक्रम पार पडला. पहिल्या सत्रामध्ये समाजातील विविध कलाकरांचा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम तसेच 10 वी 12 वी, पदवी, पदवीका प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ज्या दांपत्यांच्या लग्नाला 25 व 50 वर्ष पूर्ण झाली अशा दांपत्यांचाही सत्कार करण्यात आला. तसेच ज्या समाज बांधवानी उल्लेखनीय कामगिरी केली त्यांचाही विषेश सत्कार करण्यात आले. दुसऱ्या सत्रामध्ये लहान मुले- मुली, अविवाहीत मुले- मुली व विवाहीत महिलांचा खेळ पैठणीचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमासाठी राज्यभरातून जवळपास 1000 जातीबांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी  शिरीष दत्तात्रय पोरेडी हे होते. यावेळी संस्थापक अध्यक्ष विलास सोमा, संस्थापक उपाध्यक्ष श्री विठ्ठल बरमल्लू महिला अध्यक्ष संगीता पोन्नम, कार्याध्यक्ष जयंत बरशेट्टी, उपाध्यक्ष राकेश नल्ला, सेक्रेटरी डॉ. मुरलीधर बेतेल्लू, सतीश बरशेटटी, सुहास घंटेल्लू, खजिनदार सुरेश नाथी, समन्वयक नितिन येंबर, राजू चित्तर, माहिती तंत्रज्ञान समन्वयक प्रशांत गुम्मल व सांस्कृतिक समन्वयक चिन्मय कोराड व त्यांचे सहकारी युवा मंडळ’ आदी प्रमुख उपस्थित होते. मुरलीधर बेतेल्लू यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.