Chinchwad : कार चालकाचा मोबाईल दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावला

एमपीसी न्यूज – कारमध्ये फोनवर बोलत बसलेल्या चालकाचा मोबाइल दुचाकीवरून आलेल्या तीन चोरट्यांनी हिसकावून नेला. ही घटना रविवारी (दि. 15) ऑटो क्‍लस्टर येथे घडली.

सुचित गोकुळचंद पारख (वय 39, रा. एम्पायर स्क्‍वेअर, ऑटो क्‍लस्टर शेजारी, चिंचवड) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी एम एच 14 / डी एल 5575 या दुचाकीवरील तीन चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास फिर्यादी हे ऑटो क्‍लस्टर येथे त्यांच्या कारमध्ये फोनवर बोलत बसले होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या तीन चोरट्यांनी पारख यांच्या हातातील 20 हजार रुपये किंमतीचा मोबाइल जबरदस्तीने हिसकावून नेला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.