_MPC_DIR_MPU_III

Chinchwad : चिंचवड, भोसरी मधून दोन मोटारसायकल चोरीला

एमपीसी न्यूज – चिंचवड आणि भोसरी परिसरातून घराच्या पार्किंगमध्ये पार्क केलेल्या दोन दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या. याप्रकरणी सोमवारी (दि. 6) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_IV
_MPC_DIR_MPU_II

दत्तात्रय सोपान दळवी (वय 31, रा. बळवंत कॉलनी, चिंचवडगाव) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि. 4) सायंकाळी पावणेसातच्या सुमारास दळवी यांनी त्यांची 25 हजार रुपये किमतीची मोटारसायकल (एम एच 42 / ए सी 5785) त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये पार्क केली. अज्ञात चोरट्याने बनावट चावीच्या सहाय्याने मोटारसायकल चोरून नेली. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

दुस-या प्रकरणामध्ये मल्लिकार्जुन करबस इटले (वय 21, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इटले यांनी त्यांची 15 हजार रुपये किमतीची मोटारसायकल (एम एच 24 / ए ई 6099) घरासमोर पार्क केली. अज्ञात चोरट्यांनी भर दिवसा मोटारसायकलचे लॉक तोडून चोरून नेली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.