BNR-HDR-TOP-Mobile

Chinchwad : बिग बझार मॉलच्या पार्किंगमधून दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज – बिग बाजार शॉपिंग मॉलच्या पार्किंग मधून अज्ञात चोरट्यांनी दुचाकी चोरून नेली. ही घटना 9 सप्टेंबर रोजी रात्री घडली. शॉपिंग मॉलच्या पार्किंगमध्ये सुरक्षा रक्षक असताना देखील वाहन चोरीच्या घटना वाढत आहे. यापूर्वी चिंचवड डी मार्ट शॉपिंग मॉलच्या पार्किंग मधून दुचाकी चोरीला गेल्याची घटना घडली.

सचिन कन्हैयालाल सोनार (रा. गावडे कॉलनी, चिंचवड) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सचिन 9 सप्टेंबर रोजी रात्री सव्वाआठच्या सुमारास चिंचवड येथील बिग बझार या शॉपिंग मॉलमध्ये घरगुती साहित्य खरेदी करण्यासाठी गेले. त्यांची त्यांची हिरो होंडा स्प्लेंडर कंपनीची दुचाकी मॉलच्या पार्किंगमध्ये लॉक करून पार्क केली. दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी चोरून नेली. बिग बझार मधून शॉपिंग करून सचिन रात्री दहाच्या सुमारास पार्किंगमध्ये आले. त्यांनी पार्क केलेल्या जागी त्यांची दुचाकी नव्हती. त्यांनी सर्वत्र पार्किंग परिसरात शोध घेतला. मात्र, त्यांची दुचाकी सापडली नाही. याबाबत त्यांनी तक्रार दिली असून चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

यापूर्वी चिंचवड येथील डी मार्टच्या पार्किंगमधून एक दुचाकी भरदिवसा चोरीला गेल्याची घटना घडली आहे. 23 ऑगस्ट 2019 रोजी ही घटना घडली असून कैलास शंकर धराडे (वय 30, रा. दापोडी, पुणे) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणाचा पिंपरी पोलीस तपास करीत आहेत. मात्र, शॉपिंग मॉलच्या पार्किंग परिसरात सुरक्षा रक्षक, सीसीटीव्ही कॅमेरे असतानाही या घटना उघडकीस येत नसल्याने ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

HB_POST_END_FTR-A2

.