Chinchwad : वाहन चोरीचा सपाटा कायम; सव्वा लाखांची तीन वाहने चोरीला

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात वाहन चोरांचा सुळसुळाट झाला आहे. आळंदी, देहूरोड आणि हिंजवडी परिसरातून एक लाख 30 हजार रुपये किमतीच्या तीन मोटारसायकल चोरीला गेल्या आहेत. याबाबत संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दिव्याश्री अमेदल धोका (वय 22, रा. नगरपालिका चौक, आळंदी) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धोका यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांनी त्यांची एम एच 12 / आर एक्स 6436 ही 40 हजार रुपये किमतीची मोपेड दुचाकी 13 नोव्हेंबर रोजी राहत्या इमारतीच्या पार्किंगमध्ये पार्क केली. अज्ञात चोरट्यांनी पार्किंगमधून दुचाकी चोरून नेली.

श्रेयस नरसिंग नेमणीवार (वय 21, रा. गणेश नगर, रावेत) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रेयस यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांनी त्यांची 10 हजार रुपये किमतीची एम एच 14 / ए ए 1219 ही मोटारसायकल अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये लॉक करून पार्क केली. 24 नोव्हेंबर रोजी दुपारी साडेबारा ते साडेपाच या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी चोरून नेली. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

गणेश एम (वय 23, रा. सिंबायोसिस कॅम्पस, इन्फोटेक हिंजवडी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांनी त्यांची 80 हजार रुपये किमतीची के ए 13 / ई डी 9285 ही बुलेट सिंबायोसिस कॅम्पस इन्फोटेक हिंजवडी फेज 1 येथे 26 नोव्हेंबर रोजी पार्क केली. अज्ञात चोरट्यांनी गणेश यांची बुलेट चोरून नेली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like