PimpriNews : : 1 जानेवारीनिमित्त पिंपरी-चिंचवड शहरात 69 ठिकाणी नाकाबंदी

एमपीसी न्यूज – कोरेगाव भीमा येथील जयस्तंभ अभिवादन कार्यक्रम, चाकण येथील दंगलीची घटना आणि एक जानेवारी या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी दक्षता घेतली आहे. पिंपरी-चिंचवड शहर परिसरात 69 ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली आहे. शहरात येणा-या आणि बाहेर जाणा-या सर्व मार्गांवर पोलिसांकडून कठोर तपासणी केली जात आहे.

ही नाकाबंदी शुक्रवारी (दि. 1) 24 तास राहणार आहे. संशयित वाहने, व्यक्तींची तपासणी केली जाणार आहे.

शहरात येणा-या आणि जाणा-या मार्गावरील नाकाबंदी –

_MPC_DIR_MPU_II

# भोसरी – सीएमई चौक
# एमआयडीसी भोसरी – मोशी टोल नाका
# दिघी – बोपखेल फाटा, बोपखेल
# चाकण – तळेगाव चौक आणि एच पी चौक शिक्रापूर चाकण रोड
# आळंदी – मरकळ गाव, आळंदी लोणीकंद रोड
# वाकड – वाकड ब्रिज, पेट्रोल पंप आणि डांगे चौक, रावेत औंध रोड
# हिंजवडी – चांदणी चौक, बंगळुरू -मुंबई महामार्ग
# तळेगाव दाभाडे – उर्से टोल नाका आणि सोमाटणे फाटा
# सांगवी – टकले चौक, पिंपळे निलख आणि सांगवी फाटा

शहरातील विविध भागात लावण्यात आलेली नाकाबंदी –

पिंपरी – रामनगर राममंदिर चौक, मोहननगर. दसरा चौक. डिलक्स चौक पिंपरी, संतोषी माता चौक, नेहरूनगर
चिंचवड – चाफेकर चौक. ईगल हॉटेल लिंक रोड. शिवाजी चौक वाल्हेकरवाडी
भोसरी – हरीस ब्रिज दापोडी. नाशिक फाटा चौक कासारवाडी. पीएमटी चौक भोसरी.
भोसरी एमआयडीसी – पुणे-नाशिक रोड मोशी टोलनाका. यशवंतनगर चौक एमआयडीसी भ्सोरी
निगडी – रावेत ब्रिज कॉर्नर आकुर्डी. मोरया पेट्रोल पंप. त्रिवेणी नगर चौक
दिघी – बोपखेल फाटा. देहूफाटा चौक. ममता स्वीट होम चौक दिघी.
चाकण – तळेगाव चौक. रसिका हॉटेल चाकण-शिक्रापूर रोड. राजरत्न हॉटेल नाशिक रोड वाकी.
आळंदी – मरकळ चौक. पीसीएमटी चौक. मरकळ लोणीकंद चौक.
महाळुंगे चौकी – तळवडे ब्रिज. एच पी चौक. वासुली चौक
वाकड – वाकड ब्रिज. बिर्ला हॉस्पिटल समोर. लकी बेकरी चौक. डांगे चौक रावेत औंध रोड.
हिंजवडी – माण मार्गे चांदे नांदे. पाषाण मार्गे सुस खिंड. चांदणी चौक भूगाव रोड. औंध मार्गे वाकड ब्रिज. वाय जंक्शन भूमकर चौक. राधा चौक.
सांगवी – सृष्टी चौक. वसंत दादा पुतळा दापोडी रोड दापोडी. शितोळे पेट्रोल पंप. सांगवी फाटा.
देहूरोड – तळवडे चौक कॉर्नर. सेन्ट्रल चौक देहूरोड. सवाना चौक.
तळेगाव दाभाडे – तळेगाव स्टेशन चौक. सोमाटणे फाटा. लिंब फाटा.
तळेगाव एमआयडीसी – जुना तळेगाव चाकण रोड बायपास इंदोरी. आंबी चौक एमआयडीसी रोड.
चिखली – रुपीनगर चौकी ज्योतिबा मंदिर चौक तळवडे रोड. साने चौकी भाजी मंडई चौक चिखली आकुर्डी रोड. डायमंड चौक आळंदी रोड. कुदळवाडी चौक जाधव सरकार चौक स्पाईन रोड.
शिरगाव चौकी – उर्से टोल नाका.
रावेत चौकी – भोंडवे चौक. मुकाई चौक.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.