Chinchwad:  आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पुढाकाराने चिंचवड मतदारसंघात 11 ठिकाणी रक्तदान शिबिर

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार लक्ष्मण जगताप यांनी रविवार 29 मार्च ते शुक्रवार 3 एप्रिल या दरम्यान मतदारसंघात वेगवेगळ्या 11 ठिकाणी रक्तदान शिबीराचे आयोजन केले आहे. सोशल डिस्टंसिंगचे पालन करून हे रक्तदान शिबीर पार पाडले जाणार आहे. त्यासाठी टोकन पद्धतीचा अवलंब करण्यात येणार आहे.

रक्तदात्यांना संपर्क करण्यासाठी दिलेल्या मोबाईल क्रमांकांवरून व्हॉट्सअॅपद्वारे टोकन आणि रक्तदान करण्याची वेळ दिली जाणार आहे. दिलेल्या वेळेतच शिबिराच्या ठिकाणी टोकनसह येऊन रक्तदात्यांनी रक्तदान करावे आणि सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे. चिंचवड मतदारसंघातील नागरिकांनो तुम्ही रक्तदान केल्यास एका गरजू रुग्णाचा जीव वाचणार आहे. त्यामुळे आपल्या परिसरात होणाऱ्या रक्तदान शिबीरात या, रक्तदान करा आणि एका गरजू रुग्णाचा जीव वाचवा,  असे आवाहन आमदार लक्ष्मण जगताप यांनी केले आहे.

रविवार ते शुक्रवारया दरम्यान सहा दिवस दररोज सकाळी दहा ते दुपारी एक या वेळेत वेगवेगळ्या ठिकाणी हे शिबिर होणार आहे. या रक्तदान शिबिराच्या माहितीसाठी 8208487723 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

रावेत, किवळे, मामुर्डी या भागातील नागरिकांसाठी किवळे, आदर्शनगर येथील साईवर्धन हॉस्पिटलमध्ये रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. या भागातील रक्तदात्यांनी व्हॉट्सअॅपवर टोकन आणि रक्तदानाची वेळ घेण्यासाठी नगरसेविका संगीता भोंडवे (9623087373), नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ (9923947944), प्रभाग स्वीकृत सदस्य विठ्ठल भोईर (9890924999), बिभीषण चौधरी (9763701833) यांच्याशी संपर्क साधावा.

चिंचवडेनगर, प्रेमलोक पार्क या भागातील रक्तदात्यांसाठी चिंचवडेनगर, भुलेश्वर मंदिराशेजारी पक्षनेते नामदेव ढाके यांच्या जनसंपर्क कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. या भागातील रक्तदात्यांनी पक्षनेते नामदेव ढाके (9822658325),  भाजप शहर उपाध्यक्ष शेखर चिंचवडे (9881490123) यांच्याशी संपर्क साधावा.

चिंचवडगाव, तालेरानगर, केशवनगर या भागातील रक्तदात्यांसाठी चिंचवडगाव, तानाजीनगर येथील कालिका माता मंदिराजवळील सरदार गावडे कमर्शियल येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. या भागातील रक्तदात्यांनी नगरसेवक राजेंद्र गावडे (9822792689), नगरसेवक सुरेश भोईर (9822021892) यांच्याशी संपर्क साधावा.

काळेवाडी, विजनगर या भागातील रक्तदात्यांसाठी काळेवाडीतील ज्ञानेश्वरी मंगल कार्यालयात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. या भागातील रक्तदात्यांनी प्रभाग स्वीकृत सदस्य विनोद तापकीर (9822880397) आणि सामाजिक कार्यकर्ते विलास पाडाळे (9822222400) यांच्याशी संपर्क साधावा.

थेरगावमधील रक्तदात्यांसाठी नगरसेविका अर्चना बारणे यांच्या संपर्क कार्यालयात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. या भागातील रक्तदात्यांनी काळूराम बारणे (9850982161) आणि तानाजी बारणे (9545047777) यांच्याशी संपर्क साधावा.

थेरगाव, गणेशनगर या भागातील रक्तदात्यांसाठी थेरगावातील संतोष मंगल कार्यालय आणि मोरया मंगल कार्यालयात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. या भागातील रक्तदात्यांनी माजी नगरसेवक संतोष बारणे (9890901081) आणि माजी नगरसेवक सिद्धेश्वर बारणे (9822270276) यांच्याशी संपर्क साधावा.

वाकड आणि पुनावळे या भागातील रक्तदात्यांसाठी वाकड येथे राम वाकडकर यांचे संपर्क कार्यालय आणि विशाल कलाटे यांचे संपर्क कार्यालय येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. या भागातील रक्तदात्यांनी भाजपचे शहर उपाध्यक्ष राम वाकडकर (9822887505) आणि सामाजिक कार्यकर्ते विशाल कलाटे (9822548879) यांच्याशी संपर्क साधावा.

पिंपळेनलिख, वेणूनगर या भागातील रक्तदात्यांसाठी वाकड, कस्पटेवस्ती येथील पिंपरी-चिंचवड महापालिका शाळेच्या शेजारील संस्कृती सोसायटी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या भागातील रक्तदात्यांनी नगरसेवक संदीप कस्पटे (9923524444) आणि माजी नगरसेवक विनायक गायकवाड (9673006363) यांच्याशी संपर्क साधावा.

रहाटणी, श्रीनगर आणि तापकीरनगर या भागातील रक्तदात्यांसाठी रहाटणी, नखाते वस्ती येथील विठ्ठल रखुमाई मंदिरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. या भागातील रक्तदात्यांनी नगरसेवक चंद्रकांत नखाते (9623784949) आणि प्रभाग स्वीकृत सदस्य संदीप नखाते (9975757474) यांच्याशी संपर्क साधावा.

पिंपळेसौदागर आणि रहाटणी या भागातील रक्तदात्यांसाठी पिंपळेसौदागर येथील पृथ्वीराज मंगल कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. या भागातील रक्तदात्यांनी प्रभाग स्वीकृत सदस्य संदीप नखाते (9975757474) आणि संकेत कुटे (9823495329) यांच्याशी संपर्क साधावा.

पिंपळेगुरव, सुदर्शननगर, जुनी सांगवी आणि नवी सांगवी या भागातील रक्तदात्यांसाठी पिंपळेगुरव येथील रामकृष्ण मंगल कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. या भागातील रक्तदात्यांनी प्रभाग स्वीकृत सदस्य महेश जगताप (8669167115) आणि संजय मराठे (9850209850) यांच्याशी संपर्क साधावा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.