Chinchwad: युवा सेनेच्या वतीने आयोजित शिबिरात 51 जणांचे रक्तदान

Chinchwad: Blood donation of 51 people in the camp organized by Yuva Sena

एमपीसी न्यूज- चिंचवड विधानसभा मतदारसंघातील युवा आणि युवती सेनेच्या वतीने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. 51 जणांनी रक्तदान केले.

थेरगावातील दत्त मंदिर येथे गुरुवारी (दि.4) रक्तदान शिबिर पार पडले. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, नगरसेवक निलेश बारणे, माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे, विश्वजित बारणे, युवासेना अधिकारी राहुल पालांडे, रुपेश कदम, प्रताप बारणे, अनिता तुतारे, शर्वरी जळमकर आदी उपस्थित होते.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्तदान शिबिरे होत नाही. त्यामुळे रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रक्तदान घेण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार युवा सेनेच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.