Chinchwad: चिंचवडमध्ये शुक्रवारी ‘महापौर चषक बॉडी बिल्डिंग’ स्पर्धा 

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आणि पिंपरी-चिंचवड अमेच्युअर बॉडी बिल्डिंग असोसिएशन यांच्या सहकार्याने माजी महापौर डॉ. वैशाली घोडेकर (लोंढे) महापौर चषक 59  वी राष्ट्रीय बॉडी बिल्डिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा उद्या शुक्रवार (दि. 28) आणि शनिवारी (दि.29) रोजी होणार आहे. 

चिंचवडमधील प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहात होणा-या या 59 वी राष्ट्रीय बाॅडी बिल्डिंग स्पर्धेत पिंपरी-चिंचवड शहरातील 10 खेळाडू सहभागी होणार आहेत.

या स्पर्धेत 27 राज्यातून महिला व पुरूष असे मिळून एकूण 300 खेळाडू सहभागी होणार आहेत. विजेत्या खेळाडूंना 16 लाख 65 हजार रूपयांची रोख बक्षिसे आणि ट्रॉफी, मेडल्स अशी बक्षिसे दिली जाणार आहेत. या स्पर्धेसाठी इंडियन बॉडी बिल्डिंग फिटनेस फेडरेशनचे सचिव संजय मोरे, महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोशिएशनचे सचिव राजेंद्र सातपूरकर, पिंपरी-चिंचवड अमेच्युअर बॉडी बिल्डिंग असोसिएशनचे सचिव राजेश सावंत यांचे सहकार्य लाभणार आहे. याबाबतची माहिती क्रीडा विभागाच्या सहाय्यक आयुक्त आशा राऊत यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.