Chinchwad : वाल्हेकरवाडी येथे कारमध्ये आढळला मृतदेह

Dead body found in car at Walhekarwadi Chinchwad

एमपीसी न्यूज – चिंचवडमध्ये एका कारमध्ये एका व्यक्तीचा मृतदेह सापडला आहे. ही घटना सोमवारी (दि. 1) सायंकाळी सहाच्या सुमारास उघडकीस आली आहे.

उदयसिंह तात्यासाहेब गायकवाड (वय 58, रा. बिजलीनगर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

पोलीस निरीक्षक विश्वजित खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सायंकाळी सहाच्या सुमारास आहेर गार्डनच्या बाहेर एका कारमध्ये मृतदेह आढळल्याची माहिती मिळाली. त्यानुसार चिंचवड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला.

मृतदेहाची ओळख पटली असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. मृतदेहावर कोणत्याही जखमा नाहीत. त्यामुळे हा खुनाचा प्रकार नसल्याची प्राथमिक माहिती आहे. उत्तरीय तपासणीनंतर नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.

चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.