Chinchwad : गांजा बाळगल्याप्रकरणी दोघांना अटक; 16 किलो गांजा जप्त

अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई

एमपीसी न्यूज – गांजा बाळगल्याप्रकरणी चिंचवड येथून दोघांना दोघांना अटक केली. त्यांच्याकडून 16 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई अंमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई केली.

प्रल्हाद सुनिल माचरे (वय 21, रा. गांधीनगर झोपडपट्टी, जळगाव) आणि संतोष बन्सी गुमाने (वय 38, रा. येरवडा) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

याबाबत पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस नाईक संतोष दिघे यांना माहिती मिळाली की, दोघेजण मोठ्या प्रमाणात गांजा घेऊन चिंचवडमधील हॉटेल ईगल एक्‍झीक्‍युटीव्ह जवळील पुलाजवळ आले आहेत. त्यानुसार अंमली पदार्थ विरोधी पथकाने सापळा रचत प्रल्हाद आणि संतोष यांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे 16 किलो 50 ग्रॅम वजनाचा तब्बल 3 लाख 23 हजार 270 रुपयांचा गांजा सापडला. सर्व ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

ही कारवाई अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ, पोलीस उपनिरीक्षक वसंत मुळे, पोलीस हवालदार राजन महाडीक, प्रदीप शेलार, राजेंद्र बांबळे, रमेश भिसे, पोलीस नाईक संतोष दिघे, दिनकर भुजबळ, पोलीस शिपाई शैलेश मगर, दादा धस, संतोष भालेराव, प्रसाद जंगलीवाड, प्रदीप गुट्टे यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
HB_POST_END_FTR-A2
You might also like