Chinchwad News : पाठलाग आणि अश्लील मेसेज करत मैत्रिणीचा विनयभंग

एमपीसी न्यूज – तरुणीचा पाठलाग करून तिला अश्लील मेसेज केल्याप्रकरणी तरुणीच्या मित्रावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ऑगस्ट ते 26 ऑक्टोबर 2021 या कालावधीत निगडी ते दळवीनगर चिंचवड या मार्गावर घडला.

देवेंद्र बाळासाहेब ढोकणे (वय 29, रा. प्राधिकरण) याला पोलिसांनी याप्रकरणी अटक केली आहे. पीडित तरुणीने चिंचवड पोलीस ठाण्यात बुधवारी (दि. 27) फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा पीडित तरुणीचा मित्र आहे. त्याने फिर्यादीचा ऑफिसवरून घरी जाताना पाठलाग केला. त्यानंतर त्याने फिर्यादी यांना मोबाईल फोनवर अश्लील मेसेज केले. त्यांना मानसिक त्रास दिला. याबाबत तरुणीने पोलिसात धाव घेत गुन्हा नोंदवला आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.