Chinchwad : बंद घराचे कुलूप तोडून दागिन्यांसह रोकड लंपास; अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड असा एकूण 91 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना मोहननगर, चिंचवड येथे मंगळवारी (दि. 22) उघडकीस आली.

भगवान पांडूरंग काळे (वय 68, रा. प्रथम हौसिंग सोसायटी, चिंचवड स्टेशन) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री साडेअकरा ते मंगळवारी पहाटे साडेचार वाजताच्या दरम्यान काळे यांचे घर कुलूप लावून बंद होते. दरम्यान, चोरट्यांनी त्यांच्या दरवाजाचे कुलूप तोडून आतील सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्‍कम असा एकूण 91 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.