Chinchwad : चिंचवड आणि चिखली परिसरात घरफोड्या करणाऱ्यास अटक ; 70 हजारांचे मोबाईल जप्त

गुन्हे शाखा युनिट दोनची कारवाई

एमपीसी न्यूज – चिंचवड आणि चिखली परिसरात घरफोडीचे गुन्हे करणा-या एका चोरट्याला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून 70 हजार रुपयांचे सात मोबाईल फोन जप्त करण्यात आले असून चिंचवड आणि चिखली पोलीस ठाण्यातील दोन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

सुरज चौपडे (रा. रूपीनगर, चिखली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलश गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, चिखली पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना गुन्हे शाखेच्या युनिट दोनचे पोलीस कर्मचारी नामदेव राऊत आणि नामदेव कापसे यांना माहिती मिळाली की, चिखली पोलीस ठाण्यातील घरफोडीच्या गुन्ह्यातील सराईत आरोपी सुरज थरमॅक्स चौक येथे येणार आहे. त्यानुसार, पोलिसांनी परिसरात सापळा रचून सुरज याला अटक केली. त्याच्याकडून चिखली पोलीस ठाण्यातील चार, चिंचवड पोलीस ठाण्यातील एक आणि इतर दोन असे एकूण 70 हजार रुपयांचे सात मोबाईल फोन जप्त केले. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

दुस-या एका कारवाईमध्ये गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस कर्मचारी शिवानंद स्वामी माहिती मिळाली की, नाशिक शहर देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यातील भारतीय दंड विधान कलम 109, 341 आणि 342 मधील पाहिजे असलेला आरोपी सुरज जगन आठवल (रा. खडकी) हा नाशिक येथे गुन्हा करून पुणे येथे आला आहे. त्यानुसार, पोलिसांनी त्याला देखील सापळा रचून अटक केली. नाशिक शहर पोलिसांकडे त्याला सुपूर्द करण्यात आले आहे. नाशिक पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like