Chinchwad : घरफोडी करत चोरट्यांनी चोरली ‘नथ’

एमपीसी न्यूज – चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून घरातून टीव्ही, रोख रक्कम आणि सोन्याची नथ चोरून नेली. ही घटना मोरया कॉलनी, वाल्हेकरवाडी येथे घडली.

विक्रम शंकर कांबळे (वय 53, रा. मोरया कॉलनी, वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कांबळे यांचे घर शुक्रवारी (दि. 11) रात्री अकरा ते सोमवारी (दि. 14) रात्री साडेआठ या कालावधीत कुलूप लावून बंद होते. दरम्यान अज्ञात चोरटयांनी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील टीव्ही, रोख रक्कम आणि सोन्याची नथ असा एकूण 27 हजार 300 रुपयांचा ऐवज चोरून नेला. सोमवारी रात्री साडेआठ वाजता ही घटना उघडकीस आली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.