Chinchwad : घरफोडी करून साडेतीन लाखांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज – घरफोडी करून अज्ञात चोरट्यांनी 3 लाख 55 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना ज्ञानदीप कॉलनी, चिंचवडेनगर येथे उघडकीस आली.

दत्तात्रय भगवान चिंचवडे (वय 39, रा. ज्ञानदीप कॉलनी, चिंचवडेनगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्तात्रय 1 ते 7 मे या कालावधीत गावी गेले होते. या दरम्यान त्यांचे घर कुलूप लावून बंद होते. अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील बेडरूममधून 160 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि पाच हजार रुपयांची रोकड असा एकूण 3 लाख 55 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. सात मे रोजी दत्तात्रय घरी आले असता हा प्रकार उघडकीस आला. त्यांनी याबाबत चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.