Chinchwad : मेडिकल दुकानाचे शटर उचकटून रबरी स्टॅम्प चोरीला

एमपीसी न्यूज – रबर स्टॅम्प चोरण्यासाठी एका चोरट्याने मेडिकल दुकानाचे शटर उचकटून चोरट्याने दुकानातील रबरी स्टॅम्प पळवले. ही घटना मंगळवारी (दि. 21) पहाटे नवी सांगवी येथे उघडकीस आली.

नवनाथ जालिंदर ससाणे (वय 32, रा. समर्थनगर, नवी सांगवी) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास ससाणे यांनी नेहमीप्रमाणे दुकान बंद केले. बुधवारी सकाळी त्यांना दुकानाचे शटर उचकटलेले दिसून आले. मात्र दुकानातील कोणतेही औषध किंवा वस्तू चोरीस गेलेल्या नव्हत्या. केवळ रबरी स्टॅम्प चोरीस गेल्याचे दिसून आले. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.