मंगळवार, डिसेंबर 6, 2022

Chinchwad : बिजलीनगरमध्ये 80 हजारांची घरफोडी

एमपीसी न्यूज – बिजलीनगर चिंचवड (Chinchwad) येथे चोरटयांनी घरफोडी करून 80 हजार 200 रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना मंगळवारी (दि. 22) सकाळी उघडकीस आली.

नरसिंह शिवराज कुंभार (वय 31, रा. बिजलीनगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Bhosari Crime : मुलीच्या विनयभंगाचा जाब विचारणाऱ्या वडिलांना मारहाण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे घर रविवारी (दि. 20) रात्री आठ ते मंगळवारी सकाळी पाच वाजताच्या (Chinchwad) कालावधीत कुलूप लावून बंद होते. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील कपडे अस्ताव्यस्त करून 27 ग्रॅम वजनाचे सोन्याचे आणि 15 ग्रॅम वजनाचे चांदीचे असे एकूण 80 हजार 200 रुपयांचे दागिने चोरून नेले. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

Latest news
Related news