Chinchwad : चिंचवड येथे 83 हजारांची घरफोडी

एमपीसी न्यूज – चिंचवड येथील बिजलीनगर (Chinchwad) परिसरात 83 हजार रुपयांची घरफोडी झाली आहे. ही चोरी सोमवारी (दि. 30) सायंकाळी सात ते मंगळवारी (दि. 31) सकाळी सहा या कालावधीत घडली.

याप्रकरणी महिलेने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Mhalunge Crime : म्हाळुंगे येथे लॉजवर छापा सहा महिलांची सुटका

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे घर कुलप लावून (Chinchwad) बंद असताना अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातूनच 83 हजार 484 रुपये किमतीचे 35.750 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेले. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.