Chinchwad Business News : सीजीव्ही ज्वेलर्सच्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त घडणावळीवर 20 टक्के सूट

विना अट विना घट 20 टक्के पर्यंत सूट

एमपीसी न्यूज – विश्वासार्हता, शुद्धता आणि 100 टक्के हॅालमार्क असलेलं सोनं मिळण्याचं ठिकाण म्हणून चंपालाल गुलाबचंद वर्मा (सीजीव्ही) ज्वेलर्स शहरात प्रसिद्ध आहेत. ‘सीजीव्ही’ चिंचवड मधील सर्वात पहिली सुवर्णपेढी असून चिंचवड गावात नव्यानं उभारलेल्या दालनाचा दुसरा वर्धापनदिन येत्या सोमवारी (दि.12) साजरा होत आहे.

शहरातील पहिली सुवर्णपेढी म्हणून लौकिक असलेल्या सीजीव्ही ज्वेलर्स यांनी सोन्याची शुद्धता आणि ग्राहकांची विश्वासार्हता याच्याशी तडजोड न करता ग्राहकांना नेहमीच उत्कृष्ट सेवा पुरवली आहे. नव्या दालनाच्या दुसऱ्या वर्धापन दिनाच्या औचित्यानिमित्त ‘सीजीव्ही’ ज्वेलर्सने सोन्याच्या घडणावळीवर विना अट विना घट 20 टक्क्यांपर्यंत सूट दिली आहे.


टेम्पल ज्वेलरीसाठी ‘सीजीव्ही’ प्रसिद्ध आहेत, नाविन्यपूर्ण आणि सुबक टेम्पल ज्वेलरी मिळण्याचे हे एकमेव दालन आहे. हॅालमार्क असलेले सोने, चांदी, हिरे, पाचू आणि लाईट वेट दागिने याठिकाणी मिळतात. चांदीच्या नाविन्यपूर्ण सुबक कलाकृती व दागिन्यांचे नवनवीन डिझाईन येथे उपलब्ध आहेत. ग्राहक सीजीव्हीच्या विश्वासार्हता आणि सेवेबद्दल समाधान व्यक्त करतात.

सीजीव्ही ज्वेलर्सचे 1100 स्वेअर फुटचे भव्य दालन असून ग्राहकांना याठिकाणी सुरक्षितपणे भरपुर डिझाईन पाहता येतात. ‘सीजीव्ही’ हे 120 जणांचे कुटुंब असून पिंपरी चिंचवड मध्ये विविध ठिकाणी त्यांची एकूण सहा दालनं आहेत.

निलेश वर्मा हे चंपालाल गुलाबचंद वर्मा ज्वेलर्सचे संचालक आहेत. तसेच जगदीश वर्मा, सुनील वर्मा, गोविंद वर्मा व योगेश वर्मा यांच्या देखरेखीखाली ज्वेलर्सचे काम चालते. दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त चिंचवड गावातील ‘सीजीव्ही’ दालनात सत्यनारायण पूजा आयोजित केली आहे. या पूजेच्या महाप्रसादाचा सर्वांनी लाभ घ्यावा तसेच, वर्धापन दिनानिमित्त दिलेल्या 20 टक्के विना अट विना घट या सवलतीचा फायदाही ग्राहकांनी घ्यावा, असे आवाहन ‘सीजीव्ही’ ज्वेलर्सच्या वतीने निलेश वर्मा यांनी केले आहे.

 

अधिक माहितीसाठी ‘सीजीव्ही’ ज्वेलर्स, हिंदुस्तान बेकरी शेजारी, चाफेकर चौक, चिंचवड गाव – 411033, क्रमांक – 9890694700 येथे संपर्क साधावा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.