Chinchwad Business News: जयहिंद पेट्रोल पंपावर स्वातंत्र्यदिनापासून पेट्रोल भरणे व ऑईल बदलण्यासाठी खास सेवेस प्रारंभ

एमपीसी न्यूज – जयहिंद हायवे सर्विस स्टेशन या पेट्रोल पंपाने ग्राहक सेवेची 55 वर्षे या स्वातंत्र्यदिनी पूर्ण केली. यावर्षीचा स्वातंत्र्यदिन भारत पेट्रोलियमचे टेरेटरी मॅनेजर सी. एच. विनोद व भारत पेट्रोलियमचे सेल्स मॅनेजर स्वामीनाथन् गोस्वामी आणि जयहिंद हायवे स्टेशनचे संचालक भूषण देसाई व अमित देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला. स्वातंत्र्यदिनानिमित्त पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी, ऑइल बदलण्यासाठी खास सेवा सुरू करण्यात आली आहे.

इंधन पुरविणारा चिंचवड-स्टेशन येथील तीन शिफ्टमध्ये चालणारा सर्वात जुना व उत्तम इंधन सेवा पुरविणारा नामांकित असा भारत पेट्रोलियम कंपनीचा जयहिंद हायवे सर्विस स्टेशन हा पेट्रोलपंप आहे. या पेट्रोल पंपाची स्थापना 1966 साली झाली असून या 15 ऑगस्टला 55 वर्षे सेवा पूर्ण झाली आहे.

पेट्रोल पंपावर टँक फुल करणाऱ्या चारचाकी वाहनांसाठी खास VIP सेवा व दुचाकी वाहनांसाठी Quick oil changing या सेवा सुरु करण्यात आल्या आहेत. या स्कीममुळे टूव्हीलर गाडीमध्ये अॕटोमॕटिक जुने ऑईल बदलून नवीन ऑईल भरुन मिळते. शिवाय अतिरिक्त 50 रुपयांचे पेट्रोल (फ्री) मिळते. या बरोबरच डिस्काऊंट कूपन देण्यात येत असून त्यातून लकी ड्रॉ काढला जाणार आहे. म्हणजे एका ऑईलमागे ग्राहकांना 150 रुपये फायदा होत आहे.

जयहिंद हायवे सर्विस स्टेशन पेट्रोल पंप हा संपूर्ण अत्याधुनिक तंत्रज्ञानाने विकसित म्हणजेच फुल्ली ऑटोमेशन केलेला आहे. हवा भरण्यासाठी ऑटोमॅटिक नायट्रोजन एअर मशीन बसवली असून स्वतंत्र, सीसीटीव्ही कॅमेरा, कार्ड स्वॅपिंग,स्मार्ट फ्लीट कार्ड मशिन, सर्व प्रकारचे क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि सर्व ऑनलाईन पेमेंट सेवा तसेच पेटीएम सेवा व एटीएम येथे उपलब्ध आहेत.

शिवाय पीयूसी सेवाही माफक दरात येथे उपलब्ध आहेत. या पेट्रोल पंपावर सोशल डिस्टन्सचे संपूर्ण पालन केले जाते. इंधन भरण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला मास्क हा बंधनकारक आहे.

जयहिंद हायवे सर्विस स्टेशन पेट्रोल पंपाच्या 55 व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने भूषण देसाई, अमित देसाई आणि परिवाराच्या वतीने सर्व ग्राहकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली आहे. भारताच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त देसाई परिवार आणि जयहिंद हायवे सर्विस स्टेशन पेट्रोल पंपाच्या टीमकडून पिंपरी-चिंचवडच्या सर्व नागरिकांना आणि ग्राहकांना हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

पत्ता –

जयहिंद हायवे सर्विस स्टेशन

पेट्रोल पंप 218, न्यू पुणे मुंबई रोड,

महावीर चौक चिंचवड स्टेशन – 411019

संपर्क – 9890140070/9881239797

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.