Chinchwad Bye-Election : शंकर जगताप, भाऊसाहेब भोईर, प्रशांत शितोळे यांच्यासह 32 व्यक्तींनी घेतले 62 अर्ज

एमपीसी न्यूज – चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांच्यापाठोपाठ बंधू शंकर जगताप यांनीही (Chinchwad Bye-Election) उमेदवारी अर्ज घेतला आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर, प्रशांत शितोळे, मोरेश्वर भोंडवे, संतोष नवले यांच्यासह आज (शुक्रवारी) 32 व्यक्तींनी 62 अर्ज घेतले आहेत. तर, एका अपक्ष उमेदवाराने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी मंगळवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. उमेदवारी दाखल करण्याची अंतिम तारीख 7 फेब्रुवारी आहे. अर्ज दाखल करण्यासाठी केवळ 4 दिवस शिल्लक राहिल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच प्रमुख पक्षाकडून इच्छुक असलेल्यांनी अर्ज घेण्यास सुरुवात केली आहे.

Alandi : श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेतील माऊली बागेच्या वर्धापना दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न

भाजपचे शंकर पांडुरंग जगताप, राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक भाऊसाहबे सोपानराव भोईर, प्रशांत कृष्णराव शितोळे, मोरेश्वर महादू भोंडवे, पिंपळेसौदागर येथील दिवंगत आमदार जगताप यांचे कट्टर समर्थक संतोष किसन नवले, शंकर शिवाजी माने, राजेश यशवतंराव नागोसे, नंदू गोविंद बारणे,(Chinchwad Bye-Election) प्रविणकुमार अशोक कदम, श्रीकांत शहाजी गोरे, मनोज मधुकर खंडागळे, सतीश श्रावण कांबिये, सुरेश एकनाथ जगधने, सायली किरण नढे, प्रतिमा विनोदसिंह राजे, दिलीप खंडुजी पांढरकर, राहुल निवृत्ती मदने, अॅड. मिलिंद रोहीदास कांबळे, मेहुल भरत जोशी, गणेश तुकाराम कदम, दयानंद नानासाहेब सरवदे, ज्ञानेश्वर तुळशीराम मलशेट्टी, रवि रमेश नांगरे, निखील दिगंबर भोईर, भाग्यश्री निखील भोईर, झेविअर अॅन्थोनी, सचिन दत्तात्रय धनकुडे, सुहास पोपट गजरमल, काटे आनंद दिपक, प्रियंका सलील कदम, स्वप्नील भागीरथ बनसोडे, राजश्री ज्ञानेश्वर कोरडे या 32 व्यक्तींनी 62 अर्ज घेतले आहेत. तर, एका अपक्ष उमेदवाराने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

31 जानेवारीपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. आज अखेर पर्यंत एकूण 4 उमेदवारांनी 5 अर्ज दाखल केले आहेत. तर, 93 जणांनी 170 उमेदवारी अर्ज घेतले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.