Chinchwad Bye Election : आम्ही भावनिक राजकारण करत नाही म्हणत ‘आप’ने ठोकला शड्डू

एमपीसी न्यूज – आम्ही भावनिक राजकारण करत (Chinchwad Bye Election)  नाही. सहानुभूतीचे राजकारण आम्हाला मान्य नाही. लोकशाहीत कोणताही मतदार संघ कुणाची जहागिरी नसते, असे सांगत आम आदमी पार्टीने चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीत शड्डू ठोकला आहे. पुढील दोन दिवसात उमेवार जाहीर करणार असल्याचे आप’चे प्रदेश उपाध्यक्ष, पिंपरी-चिंचवड प्रभारी हरिभाऊ राठोड यांनी सांगितले.

आम आदमी पार्टीच्या आकुर्डी येथील कार्यालयात पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती देण्यात आली. पुणे जिल्हाध्यक्ष मुकुंद कीर्दत, शहर कार्याध्यक्ष चेतन बेंद्रे, शहराध्यक्ष अनुप शर्मा उपस्थित होते.

राठोड म्हणाले की, चिंचवड विधानसभेची पोट निवडणूक लढण्यासंदर्भात पार्टीचे स्थानिक कार्यकर्ते आणि केंद्रीय पातळीवरील वरिष्ठ यांच्याशी चर्चा झाली आहे. पोट निवडणूक आम आदमी पार्टी लढणार आहे. आत्तापर्यंत बऱ्याच इच्छुकांनी तिकिटासाठी अर्ज दाखल केले आहेत. येत्या दोन दिवसात आपचा उमेदवार जाहीर केला जाईल.

मोठ्या प्रमाणात नागरीकरण झालेल्या चिंचवड विधानसभा मतदार संघामध्ये पुरेसा शुद्ध पाणी (Chinchwad Bye Election) पुरवठा,जन आरोग्य सुविधा,सुरक्षित रस्ते,सामाजिक सुरक्षा,प्रवासी वाहतूक,वीज वितरण अशा अनेक नागरी समस्या आहेत. चिंचवड विधानसभा किंवा शहरातील इतर विधानसभा मतदार संघातील राजकारण गावकी भावकी नाती गोती यावर आधारित आहे. आम्ही राष्ट्रीय स्तरावर ग्लोबल व आधुनिक राजकीय संस्कृती निर्माण करत आहोत. पिंपरी-चिंचवड शहराचे राजकारण,समाजकारण संविधानिक चौकटीत चालले पाहिजे.

Chinchwad Bye Election : राजकीय घडामोडींना वेग; अश्विनी जगताप, नाना काटे, रेखा दर्शिले यांच्यासह 17 व्यक्तींनी घेतले 32 अर्ज

विविध भारती अशी ओळख असलेल्या चिंचवड विधानसभा मतदार संघातील प्रश्न हे स्मार्ट सिटीच्या रुपरेषेने सोडवले पाहिजेत असे हरिभाऊ राठोड यांनी सांगितले.

आम्ही भावनिक राजकारण करत नाही.सहनुभूतीचे राजकारण आम्हाला मान्य नाही. लोकशाहीत कोणताही मतदार संघ कुणाची जहागिरी नसतो. घराघरात आमचा नेता व आमचा पक्ष पोचलेला आहे. त्यामुळे सामान्य जनतेचा आवाज त्याचे प्रश्न यासाठी आम्ही महाराष्ट्रात ही प्रथम निवडणूक लढवत असल्याचे मुकुंद किर्दत म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.