Chinchwad Bye-Election : उमेदवारी जाहीर झाल्यावर अश्विनी जगताप म्हणाल्या…

एमपीसी न्यूज – चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी (Chinchwad Bye-Election) भाजपची उमेदवारी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना आज (शनिवारी) जाहीर झाली आहे. त्यानंतर प्रतिक्रिया देताना त्या म्हणाल्या, आमच्या कुटूंबात कोणतेही मतभेद नाहीत. भाऊंचा वारसा मी पुढे घेऊन जाणार आहे.

अश्विनी जगताप म्हणाल्या, या निवडणुकीकडे पाहताना मी साहेबांचा वारसा पुढे नेण्याचा आटोकाट प्रयत्न करीन. त्यांची अपूर्ण राहिलेली स्वप्ने पूर्ण करेल. शहर मेट्रो सिटी करायचे ही त्यांची महत्वकांक्षा होती. ती पूर्ण करण्याचा आटोकाट प्रयत्न करील. पक्षाचा अजेंडा पुढे नेईल. पक्षाने दिलेला निर्णय पूर्णपणे मला मान्य आहे. पक्षाने कोणालाही उमेदवारी दिली तरी त्याला आम्ही पाठींबा देऊ असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. कोणालाही तिकीट दिले तरी जगताप कुटूंबियांचा पूर्णपणे पाठींबा असेल.

NEBC Project : एनईबीसी कमर्शिअल हबमध्ये मिळवा ऑफिसच्या दरात दुकान ते ही 10 ग्रॅम सोन्यासह

आम्ही सर्वजण एक आहोत. कुटूंबात कोणतेही वाद नाहीत. वावटळ उठविली होती. कसलाही वाद (Chinchwad Bye-Election) नाही. शंकरशेठ मला मुलासारखे आहेत. गेली 30 वर्षे आमचे एकत्र कुटूंब आहे. त्यामुळे कसलाही वाद आमच्या घरात नाही. आमच्या कुटूंबात 6 मुले आहेत असे मी आणि साहेब म्हणायचो.

मला एकच मुलगी आहे, असे मी कधीच म्हटले नाही. विरोधकांना हात जोडून विनंती आहे, की असले वावटळ भविष्यात तरी उठवू नये. कुटुंब एक आहे आणि एकच राहील. भाऊंची निवडणूक आम्हा सर्वांना सारखी होती. मी जरी पडद्यामागून त्यांच्या पाठीशी उभी होते. त्यामुळे जरी फ्रंट नसले तरी पाठीमागे राहून काम करत होते. पिंगळेगुरव, सांगवी, नवी सांगवी, रहाटनी परिसर मी पिंजून काढायचे. त्यामुळे मला हा परिसराची माहिती आहे. नगरसेवक, कार्यकर्ते माझ्यासोबत असायचे. कशा पद्धतीने निवडणुकीला सामोरे जायचे याचा चांगला मला अनुभव आहे, असेही त्या म्हणाल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.