Chinchwad Bye-Election : पोटनिवडणुकीसाठी 40 उमेदवारांचे अर्ज दाखल

एमपीसी न्यूज – चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी एकूण 40 उमेदवारांनी 53 अर्ज दाखल केले आहेत. आज (मंगळवारी) अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्यादिवशी (Chinchwad Bye-Election) 26 जणांनी अर्ज दाखल केले. या अर्जांची 8 फेब्रुवारीला छाननी होणार आहे. तर, 10 फेब्रुवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे.

चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी 31 जानेवारी पासून अर्ज वाटप सुरु झाले. आज अखेरपर्यंत 128 जणांनी 231 अर्ज नेले. त्यापैकी 40 उमेदवारांनी 53 अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये किती जणांचे अर्ज छाननीत बाद होतात. किती उमेदवार मागे घेतात आणि प्रत्यक्षात निवडणुकीत किती उमेदवार राहतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

यांनी भरले आहेत उमेदवारी अर्ज

भाजपकडून अश्विनी जगताप, भाजपचे पर्यायी उमेदवार म्हणून शंकर जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसकडून नाना काटे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून राहुल कलाटे यांनी अर्ज दाखल केला आहे. पण, त्यांनी एबी फॉर्म दिला नाही. त्यामुळे त्यांचा अपक्ष अर्ज राहील.

Bye-Election : जगाची डिजिटल मिडियाकडे वाटचाल सुरु असताना डिजिटल मिडियाला वार्तांकनास पासेस नाकारले

आम आदमी पार्टीचे मनोहर पाटील, संभाजी ब्रिगेडचे प्रविण कदम, बहुजन भारत पार्टीचे तुषार लोंढे, महाराष्ट्र लोकहितवादी पार्टीचे प्रफुल्ला मोतिलिंग, आजाद समाज पार्टीचे मनोज खंडागळे, बहुजन मुक्ती पार्टीचे सतिश कांबिये, बहुजन भिम सेनेचे मोहन म्हस्के तर अनिल सोनावणे, मिलिंद कांबळे, अजय लोंढे, रफिक कुरेशी, रविंद्र पारधे, बालाजी जगताप, गोपाळ तंतरपाळे, अमोल सुर्यवंशी, (Chinchwad Bye-Election) सिद्धीक शेख, किशोर काशीकर, डॉ. मिलिंदराजे भोसले, सोयलशहा शेख, हरिश मोरे, जावेद शेख, राजेंद्र काटे, श्रीधर साळवे, राजू काळे, चेतन ढोरे, दादाराव कांबळे, गणेश जोशी, मनिषा कारंडे, चंद्रकांत मोटे, सुधीर जगताप, सतिश सोनावणे, उमेश म्हेत्रे, भाऊ अडागळे, सुभाष बोधे, प्रकाश बालवडकर, संजय मागाडे अशा 40 जणांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.