Chinchwad Bye-Election : निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती

एमपीसी न्यूज – चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीसाठी निवडणूक निरीक्षक, निवडणूक पोलीस निरीक्षक आणि निवडणूक खर्च निरीक्षकाची नियुक्ती करण्यात आली (Chinchwad Bye-Election) असल्याची माहिती उप जिल्हा निवडणूक अधिकारी आरती भोसले यांनी दिली आहे.

निवडणूक निरीक्षक म्हणून एस. सत्यनारायण यांची नियुक्ती  करण्यात आली असून त्यांचा निवासाचा पत्ता व्हीव्हीआयपी विश्रामगृह येथील कक्ष क्रमांक ए-104 असा आहे. त्यांचा संपर्क क्रमांक 8275969502 असा आहे.

निवडणूक पोलीस निरीक्षक म्हणून अनिल किशोर यादव  यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचा निवासाचा पत्ता व्हीव्हीआयपी विश्रामगृह येथील कक्ष क्रमांक ए-301 असा आहे. त्यांचा संपर्क क्रमांक 8275969501  असा आहे.

Pimpri News : अदानी उद्योग समूहाची चौकशी करा –   कैलास कदम

निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून संकल्प नारायण सिंग (Chinchwad Bye-Election) यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचा निवासाचा पत्ता व्हीव्हीआयपी विश्रामगृह येथील कक्ष क्रमांक ए-302 असा आहे. त्यांचा संपर्क क्रमांक 9404541610  असा आहे.

निवडणूक निरीक्षक कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक 020-29972546  असा आहे. नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे जिल्हा निवडणूक शाखेतर्फे कळविण्यात आले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.