Chinchwad Bye-Election : पराभव दिसू लागल्याने भाजपकडून गुंडागर्दी – रोहित पवार

एमपीसी न्यूज – चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत (Chinchwad Bye-Election) पराभव दिसू लागल्याने भाजपा गुंडगिरीवर उतरू लागला आहे. शिवसेनेच्या शहरप्रमुखांवर झालेला हल्ला हे त्याचे लक्षण आहे, असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केली.

राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचारार्थ किवळे गावठाण, मामुर्डी, आदर्शनगर, विकासनगर, वाल्हेकरवाडी, पिंपळे गुरव आणि नवी सांगवी भागात रोहित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पदयात्रा काढण्यात आली. माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, माजी नगरसेवक प्रज्ञा खानोलकर, सुमन नेटके, बापू कातळे, मनोज खानोलकर, प्रशांत सपकाळ, संजय कातळे, कामेश तरस, लाला चिंचवडे, धनंजय वाल्हेकर, विनोद कांबळे, सचिन सकाटे, अमोल पाटील, इमरान शेख सहभागी झाले होते.

MPSC News : नवा अभ्यासक्रम 2025 पासूनच; लोकसेवा आयोगाचा निर्णयावर शिक्कामोर्तब

रोहित पवार म्हणाले, या भागात असणाऱ्या पाण्याची समस्या कायम स्वरूपी सोडवण्यासाठी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी लक्ष घातले आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे. त्यामुळे (Chinchwad Bye-Election) या भागातील वाढती लोकसंख्या विचारात घेऊन त्याचे नियोजन करण्यात येईल. भारतीय जनता पक्षाने या मूलभुत समस्येचेही राजकारण केले. पवना धरणातून पाणी आणण्याच्या योजनेला त्या पक्षाने विरोध केला. ही योजना पूर्णत्वास जाऊ नये, असे प्रयत्न केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.