Chinchwad Bye-Election :  लाखांपेक्षा अधिक फरकाने पोटनिवडणूक जिंकण्याचा भाजपचा निर्धार

एमपीसी न्यूज – चिंचवडचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी आमदार म्हणून गेल्या 19 वर्षांत शहरात विकासाची गंगा आणली आहे. ही विकासगंगा निरंतर सुरू ठेवण्यासाठी चिंचवड विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत भाजपचाच आमदार होणार असल्याची (Chinchwad Bye-Election) काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. पण, हा विजय लाखाच्या फरकाने करण्याचा निर्धार भाजप शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केला आहे. तसेच चिंचवड विधानसभेच्या 13 प्रभागात आजपासूनच मैदानावर उतरून काम करण्याचे आदेश सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना त्यांनी दिले.

चिंचवड विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने भाजप पदाधिकाऱ्यांची पिंपरी, मोरवाडी येथील पक्ष कार्यालयात बैठक झाली. त्यामध्ये पोटनिवडणुकीबाबत रणनिती ठरवण्यात आली.

या बैठकीला दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप, संघटन सरचिटणीस अमोल थोरात, सरचिटणीस राजू दुर्गे, प्रदेश सदस्य व प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, चंद्रकांत नखाते, अनुप मोरे, प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार, माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप, महिला आघाडी शहराध्यक्षा उज्वला गावडे यांच्यासह पक्षाचे सर्व पदाधिकारी, माजी नगरसेवक, शक्तीकेंद्र प्रमुख, पेजप्रमुख, बुथ केंद्रप्रमुख, सर्व आघाड्यांचे अध्यक्ष, प्रभाग अध्यक्ष उपस्थित होते.

Chinchwad Bye Election : निवडणूक बिनविरोध करावी; भाजपची विरोधी पक्षाच्या शहराध्यक्षांकडे विनंती

बैठकीत मार्गदर्शन करताना भाजप शहराध्यक्ष महेश लांडगे म्हणाले, “दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप हे विकासपुरूष होते. त्यांनी या शहरात विकासगंगा आणली.(Chinchwad Bye-Election)पिंपरी-चिंचवडच्या गाव ते शहर या प्रवासात आमदार जगताप यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे. त्यांनी राजकारण आणि समाजकारण करताना सर्व घटकांना सोबत घेऊन काम केले. केवळ शहराचा विकास न करता त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांनाही बळ दिले. विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांना सुद्धा ते आदर्शवादी होते. त्यावरून त्यांचे शहराच्या राजकीय आणि सामाजिक जीवनातील स्थान स्पष्ट होते. ते सर्वांना चटका लावून गेले.

त्यांची पक्षनिष्ठा कधीच विसरता न येणारी आहे. त्यांच्या जाण्याने चिंचवड विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक लागली आहे. त्यांच्या निधनाचे दुःख विसरण्याच्या आतच ही पोटनिवडणूक लागली आहे. भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याला दुःख बाजूला ठेवून या पोटनिवडणुकीत न भूतो न भविष्यती विजय मिळवण्यासाठी काम करावे लागणार आहे.

जगताप यांनी चिंचवड विधानसभा मतदारसंघाला कुटुंबासारखे जपले होते. त्यांनी कुटुंबप्रमुख म्हणूनच या मतदारसंघात काम केले. या कुटुंबप्रमुखाने मतदारसंघात केलेला विकास वाखाणण्यासारखा आहे. त्यामुळे भाजपचा प्रत्येकजण आपल्या लक्ष्मणभाऊंचा विकासाचा वारसा जपण्यासाठी ही पोटनिवडणूक ताकदीने लढवणार आहे.

पोटनिवडणुकीत भाजपचा विजय निश्चित आहे. सर्वांनी मिळून एकदिलाने ही पोटनिवडणूक लढवूया. पोटनिवडणुकीतील विजय हा राज्यातील सर्वात मोठा विजय ठरावा यासाठी (Chinchwad Bye-Election) आपण सर्वांनी काम करायचे आहे. एक लाखांपेक्षा अधिक फरकाने चिंचवडची पोटनिवडणूक जिंकण्याचा आपला निर्धार असल्याचे त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.