Chinchwad Bye-Election : भाजपचे शंकर जगताप, आपचे मनोहर पाटील यांच्यासह 7 जणांचे उमेदवारी अर्ज बाद

एमपीसी न्यूज – चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांच्या छाननीत भाजपचे पर्यायी उमेदवार शंकर जगताप, (Chinchwad Bye-Election) आम आदमी पार्टीचे मनोहर पाटील यांच्यासह 7 जणांचे उमेदवारी अर्ज बाद झाले. तर, 33 उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले आहेत. अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी 3 अर्ज भरले होते. त्यापैकी 2 अर्ज पात्र झाले. तर, 1 अपात्र झाला.

Pune News : विद्यापीठ चौकात मेट्रोच्या कामासाठी वाहतूकीत करणार बदल

निवडणुकीसाठी 40 उमेदवारांनी 53 अर्ज दाखल केले होते. यापैकी 33 उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले. तर, 7 उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत. तर, 53 अर्जांपैकी 40 अर्ज पात्र झाले असून 13 अर्ज अपात्र झाले आहेत. उमेदवारी अर्जांची आज (बुधवारी) छाननी प्रक्रिया पार पडली. (Chinchwad Bye-Election) निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी यावेळी पात्र आणि अपात्र ठरलेल्या अर्जांची घोषणा केली. निवडणूक निरीक्षक एस. सत्यनारायण आणि निवडणूक पोलीस निरीक्षक अनिल किशोर यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या छाननी प्रक्रियेवेळी नामनिर्देशन पत्रे दाखल करणारे उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

‘यांचे’ उमेदवारी अर्ज झाले बाद!

भाजपच्या अधिकृत उमेदवार अश्विनी जगताप यांचा अर्ज पात्र झाल्याने पर्यायी उमेदवार शंकर जगताप यांचा अर्ज बाद झाला. उमेदवारी अर्ज आणि पक्षाचा ‘बी’ फॉर्म अपूर्ण असल्याने आम आदमी पार्टीचे मनोहर पाटील यांचा अर्ज बाद झाला. तर, प्रतिज्ञापत्र अपूर्ण सादर केल्याने अपक्ष चेतन ढोरे, पुरेशा सुचकांची स्वाक्षरी नसल्याने अपक्ष गणेश जोशी, आवश्यक सुचकांची नावे नसल्याने उमेश म्हेत्रे, उमेदवारी अर्ज अपूर्ण आणि एबी फॉर्म नसल्याने प्रकाश बालवडकर आणि वैधानिक तरतुदीनुसार अनामत रक्कम भरली नसल्याने संजय मागाडे अशा 7 जणांचे उमेदवारी अर्ज बाद झाले.

‘यांचे’ अर्ज झाले पात्र

भाजपच्या अश्विनी जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे, अपक्ष राहुल कलाटे, संभाजी ब्रिगेडचे प्रविण कदम, बहुजन भारत पार्टीचे तुषार लोंढे, महाराष्ट्र लोकहितवादी पार्टीचे प्रफुल्ला मोतिलिंग, आजाद समाज पार्टीचे मनोज खंडागळे, बहुजन मुक्ती पार्टीचे सतिश कांबिये, बहुजन भिम सेनेचे मोहन म्हस्के तर अनिल सोनावणे, मिलिंद कांबळे, अजय लोंढे, रफिक कुरेशी, रविंद्र पारधे, बालाजी जगताप, (Chinchwad Bye-Election) गोपाळ तंतरपाळे, अमोल सुर्यवंशी, सिद्धीक शेख, किशोर काशीकर, डॉ. मिलिंदराजे भोसले, सोयलशहा शेख, हरिश मोरे, जावेद शेख, राजेंद्र काटे, श्रीधर साळवे, राजू काळे, दादाराव कांबळे, मनिषा कारंडे, चंद्रकांत मोटे, सुधीर जगताप, सतिश सोनावणे, भाऊ अडागळे, सुभाष बोधे अशा 33 उमेदवारांचे अर्ज पात्र झाले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.