Chinchwad Bye-Election : …तर पोटनिवडणूक अवघड नाही – अजित पवार

एमपीसी न्यूज – भाजपने पोटनिवडणुका लढविल्याने आम्ही कसबा आणि चिंचवडची पोटनिवडणूक लढविण्याचा महाविकास आघाडीने निर्णय घेतला. (Chinchwad Bye-Election) चिंचवडमध्ये राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेनेला मानणारा मोठा वर्ग आहे. त्याला मेहनतीची जोड दिल्यास पोटनिवडणूक जिंकणे अवघड नसल्याचे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार म्हणाले.

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांशी चर्चा करुन  नाना काटे यांना उमेदवारी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसने शहराचा कायापालट केला. त्यामुळे विकास कामांच्या जोरावर निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. मेहनत घेतल्यास पोटनिवडणूक अवघड नाही.

Pimpri News : न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये रमाबाई आंबेडकर जयंती उत्सहात साजरी

एकदा माणूस पाच लाख मतांनी निवडणूक आला. तर, त्याला पुढच्या वेळेसही पाच लाख मते मिळत नाहीत. मते बांधिल नसतात. तसेच माझे उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणे झाले आहे. (Chinchwad Bye-Election) त्यांनी महाविकास आघाडीचा उमेदवार नाना काटे यांनाच पाठिंबा असल्याचे सांगितल्याचे त्यांनी राहुल कलाटे यांच्याबाबतच्या प्रश्नावर बोलताना सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.